संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
चालू वर्षात झालेल्या विक्रमी व आवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रथम सप्टेंबरमध्ये पावसाने भातशेतीला फटका दिलाआता आवेळी परतीच्या पावसातही भातशेतीचे तालुक्यांत फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला व आर्थिक गणित कोलमंडले आहे. यासाठी शेतीचे तात्काळ पंचनामे व सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार शरद गोसावी याना निवेदन दिले आहे.शिष्टमंडळात माजी उपसभापती रवींद्र लाड, राजाराम तीळटकर, पांडुरंग बने, अनंत नाक्ती, गणू बारे, सतीश सुर्वे, कृष्णा नाक्ती, सुरेश कुडेकर, अमोल पेंढारी, हेमंत नाक्ती, अनिकेत पानसरे आदी शिवसैनीक व शेतकरी उपस्थित होते.
"तालुक्यात भात हे मुख्य पिक घेतले जाते,नागली,वरी, तुर, मूग, उडीद, तीळ आदी दुय्यम पिके घेण्यात येतात आज पर्यंत सुमारे ५००० मि.मि. पाऊस झाला त्यात अवेळी कापणीचे हंगामात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,नुकसान भरपाई तात्काळ मिळणे आवश्यक आहे."
महादेव पाटील, तालुका प्रमुख शिवसेना.
"तालुक्यात कृषी, महसुल व ग्रामविकास विभागाचे प्रतिमिधींच्या माध्यमातुन भात व खरीपांतील अन्य पिकांचे अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तात्काळ सुरू केले आहे".
शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा.
म्हसळयात भातशेती नुकसानीचे पंचनामे सुरु पंचनामे करताना कृषी अधिकारी व अन्य...
إرسال تعليق