प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
२९ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री १० वाजता दिपावली सणानिमित्त फॅन्सी ड्रेस गरबा मनोरंजनात्मक कार्यक्रम भापट गावातील नावाजलेले ॐ शिव सत्य क्रिकेट संघ भापट यांनी आयोजन केले होते. भापट क्रिकेट संघाने आतापर्यंत शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, जनजागृती कार्यक्रम असे अनेक समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी आयोजित केले आहेत. तरी यावर्षी फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धा हा मनोरंजनात्मक स्तुत्य उपक्रम भापट गावातील कुणबी, नवबौद्ध, मुस्लिम, मराठा, आदिवासी अशा सर्व समाजातील लोकांना एकत्रित व संघटित करून हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने पार पडला.
या फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धेमध्ये लहान मुलांचा एक गट, दुसरा गट महिला आणि तिसरा गट पुरुष अशा तीन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लहान मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक- निवेदिता सुनील भोसले, द्वितीय क्रमांक- अथर्व जयसिंग बेटकर, तृतीय क्रमांक- प्रथम गणेश जोशी, चतुर्थ क्रमांक- श्रेयस अमित जोशी, उत्तेजनार्थ- आर्य कमळेश बेटकर, महिला गटामध्ये प्रथम क्रमांक- निकिता विनोद जोशी, द्वितीय क्रमांक- अनिता पांडुरंग जाडे, तृतीय क्रमांक- साक्षी नरेश बेटकर, चतुर्थ क्रमांक- ऋतिका- राजाराम बेटकर, उत्तेजनार्थ- मानसी संतोष भोसले तसेच पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक- गणेश हरी जोशी, द्वितीय क्रमांक- दिपेश दिलीप गावडे, तृतीय क्रमांक- सतीश नथुराम घडशी, चतुर्थ क्रमांक- रविंद्र दाजी कुवारे, उत्तेजनार्थ- ओमकार प्रमोद बेटकर, इत्यादी विजयी स्पर्धकांना जिओ मोबाईल, इस्त्री, हॉटपॉट, थर्मस, टिफिन, स्कुलबॅग अशाप्रकारचे भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी कलाकारांना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. या फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धेमध्ये एकुण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले त्यामध्ये प्रतिक मोहिते, समीर बेटकर, विकिता जोशी, ऋतिका बेटकर, माहिल नजिरी, तेजस कुवारे, निमेश भोसले, प्रेरणा मोहिते, आदित्य पवार, स्नेहल घडशी, स्वाती जोशी, विशेष गौरव गणेश मुकनाक आणि जयसिंग बेटकर यांचा करण्यात आला.
फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी परिक्षक मा. श्री. शाहीर भिमराव सुर्यतळ, प्राथमिक शिक्षक दिलीप शिंदे तसेच कला शिक्षक राहुल नाईक सर यांनी बहुमोल सहकार्य केले.
परिक्षक असणारे भिमराव सुर्यतळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कार्यक्रम करण्याच्या पाठीमागचे उद्दीष्ट खुपच चांगले आहे. आपण सर्व माणसं एकत्रित येणे, आपल्या गाठीभेटी होणं, आचारविचार जुळणं हा महत्त्वाचा संदर्भ अशा सणातुन, कार्यक्रमातुन साध्य होत असतो. त्याबरोबरच त्यांनी ॐ शिव सत्य क्रिकेट संघ भापट आणि ग्रामस्थ मंडळ भापट व महिला मंडळ भापट यांनी नियोजन केलेल्या कार्यक्रमाचे छान शब्दांत कौतुक केले.
या कार्यक्रमाला उपस्थित गाव अध्यक्ष प्रविण ठोंबरे, मुंबई कमिटी सचिव व क्रिकेट कमिटी अध्यक्ष रामचंद्र कुवारे, ज्येष्ठ सल्लागार नथुराम घडशी, अनंता अलिम, रविंद्र कुवारे, उपाध्यक्ष कमळेश बेटकर, सचिव जयसिंग बेटकर, सहसचिव (मुंबई) रमेश अलिम, पांडुरंग जाडे, किसन जाडे, अमोल अलिम, सतीश घडशी, राजाराम बेटकर, प्रकाश बेटकर, अमित कांदेकर, महेश घडशी, चंद्रकांत मुकनाक, राजेश कांदेकर, मनेश पाष्टे, रोहित कुवारे, प्रशांत अलिम, धोंडु भोसले, किसन भोसले, समीर नजिरी, महिला अध्यक्षा राजश्री बेटकर, सचिव रंजिता कुवारे, भाविका जोशी, रुचिता कांदेकर, शोभा मोहिते, आदी गावातील ज्येष्ठ, वरिष्ठ ग्रामस्थ, महिला, युवक, क्रिकेट संघाचे सदस्य यांनी आवर्जून उपस्थित राहून फॅन्सी ड्रेस गरबा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिकेट संघाचे अध्यक्ष रामचंद्र कुवारे यांनी केले. सुत्रसंचालन खजिनदार अमोल अलिम यांनी केले व आभार प्रदर्शन क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित कुवारे यांनी केले.
إرسال تعليق