सालाबादप्रमाणे यंदाही म्हसळ्यामध्ये गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास गड-किल्ले रूपी समजावा आणि त्यातून बाल आणि तरुणांना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असतो. ह्या स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढिल वर्षी प्रतिष्ठानचा तालुका पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात मानस आहे.विषेशतः ह्या स्पर्धेत मुलींचाही सहभाग होता.
प्रथम क्रमांक: (विभागून) कु़. अनिरुद्ध सं. कुडेकर (चंदनवंदन), आणि कु. यश महेंद्र म्हशिलकर व कु. सागर सिताराम धमाल (विजयदुर्ग)
द्वितीय क्रमांक (विभागून): कु. ओमकार ज. गोविलकर, कु. करण मंगेश घाँसी व कु. संजु भोपाराम कुंभार (संतोषगड) आणि कु. दिपेश दिनेश म्हशिलकर व अथर्व महेश म्हशिलकर (उंदेरी)
तृतीय क्रमांक (विभागून): कु. सोहम भालचंद्र करडे, कु. आर्य महेंद्र करडे व आदित्य प्रशांत करडे (प्रतापगड) आणि कु. कार्तिक बनारसी धिमर व कु. अमित दुर्गाप्रसाद धिमर (जंजिरा)
चतुर्थ क्रमांक : कु. दत्तात्रेय सुशिल म्हशिलकर (लोहगड) आणि कु. अक्षरा निलेश परबळकर (रायगड)
पाचवा क्रमांक : कु. ओम जितेंद्र पाभरेकर (रायगड) तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक: कु. श्रवण जितेंद्र म्हशिलकर व कु. आर्यन जितेंद्र म्हशिलकर यांनी पटकावला आहे.
हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री. सचिन करडे, संतोष कुडेकर, सौ. श्रेया करडे, कौस्तुभ करडे, शुभम करडे, विशाल सायकर, राजेशदादा करडे, युवराज करडे यांनी मेहनत घेतली.
إرسال تعليق