म्हसळ्यात वादळी व विक्रमी पावसाने भातशेतीचे नुकसान : एकरी नुकसान भरपाई मिळावी
शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
चालू वर्षात झालेल्या विक्रमी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरासरी पर्जन्यमान ३५०० मी.मी. असताना आजपर्यंत सुमारे ५००० मि.मि.पावसाची नोंद झाली आहे, सुरुवातीला सप्टेंबरमध्ये भातशेतीला फटका बसला होता.आता परतीच्या पावसातही भातशेतीचे तालुक्यांत फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला व आर्थिक गणित कोलमंडले आहे. यासाठी शेतकऱ्यानी महेश पवार, रामा लोणशीकर,मंगेश मुंडे , मंगेश म्हशीलकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तालुक्यात भात पिकाला एकरी रु३५ हजार नुकसान भरपाई व गुरांसाठी वैरण मिळावी अशी लेखी मागणी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाने केली आहे.तालुक्यात भात पिकाखालील क्षेत्र २४०० हेक्टर व नाचणीचे क्षेत्र ४०० हेक्टर आहे. वरी, तीळ, उडीद अशी अन्य पिकेही तालुक्यात काढली जातात.
जुलैच्या महिन्याच्या सुरवातीपासून ऑक्टोबर अखेर पर्यंत पावसाचा मारा सुरुच आहे , भात पिकापासून, नागली,वरी व अन्य बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे .शेतकऱ्याना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
महेश पवार , शेतकरी .केलटे.
तालुक्यात हळवी व उखारू दोनीही भातशेतीचे व पर्यायाने गुरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे, हवामानातील सततच्या बदलाने मशागती साठी पिकावरील हेक्टरी खर्च वाढला आहे, भात पीक भिजल्यामुळे दर्जा कमी झाला आहे. नुकसान भरपाई मिळावी.
वैभव नाक्ती, तोंडसुरे .
तालुक्यातील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक ह्याना शेतीच्या नुकसानीची तात्काळ संयुक्त पहाणी करून जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे नुकसान भरपाई साठी माहीती पाठविण्यात येईल.
के.टी. भिंगारे, निवासी नायब तहसीलदार, म्हसळा
إرسال تعليق