प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ रोजी पी.एन.पी. नाट्यगृह अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अदितीताई तटकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार श्री. सुनिलजी तटकरे, विधान म. सदस्य, आमदार जयंत पाटील, आमदार पंडितशेठ पाटील, आमदार बाळाराम पाटील, जि.प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण सभापती नरेश पाटील, जि.प. सदस्य बबन मनवे, जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि तालुक्याचे सभापती व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
म्हसळा तालुक्यातुन रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरसई (मराठी) या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून दिनेश रांगळे सर काम करीत आहेत. २१ वर्ष त्यांनी म्हसळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य केले. तुरुंबाडी, बनोटी, निगडी, खरसई, आदी शाळांमध्ये ज्ञानदान देण्याचे काम रांगळे सर यांनी केले. या शैक्षणिक कार्यात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, नवोदय विद्यार्थी धारक, आय.एस.ओ. शाळा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, अध्यात्मिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक अशा विविध कार्यांत सक्रिय सहभाग घेऊन शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच क्रिडा क्षेत्रात तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर विद्यार्थ्यांनी झेप घेतली. अशा विविध क्षेत्रात उत्तमरित्या कार्य घडवून आणण्याचे काम दिनेश रांगळे सर यांनी केले.
यावेळी पुरस्कार सोहळ्यात म्हसळा तालुक्याच्या सभापती छायाताई म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, जि.प. सदस्य बबन मनवे, धनश्री पाटील, तालुका अध्यक्ष समिर बनकर, ग.शि.अ. शेडगे सर, समाजसेवक महादेव पाटील, लहू म्हात्रे, खरसई शा.व्य. अध्यक्ष निलेश मांदाडकर, सरपंच इरशाद अकलेकर, तुकाराम मांदाडकर, प्रभाकर कांबळे, बनोटी गावचे सरपंच अनंत कांबळे, अध्यक्ष देवजी घाणेकर, तसेच अनिल बसवत, सावंत सर, जगदीश घोसाळकर, जयसिंग बेटकर, किरण पाटील, रमेश जाधव, बालाजी राठोठ सर, सानप सर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनेश रांगळे सर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारला.

إرسال تعليق