महिला आर्थिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ व नगरपालिका यांचा पुढाकार : प्लास्टिक जनजागृती मोहीम



शालेय विद्यार्थी   स्वच्छतेचा   खरा दूत  आहे   .....किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

आज समाज मन प्रगल्भ बनले आहे .आधुनिकतेचा प्रभाव सर्वत्र जाणवत आहे .मानवी जीवन शैली विकसित झाली असून नाविन्याचा स्वीकार लोकांनी केलेला आहे .त्याचा परिणाम पर्यावरणावर चांगला व वाईट दोन्ही स्वरूपाचा झाला आहे .प्लास्टिक हे पर्यावरणावर विघातक परिणाम करत आहे त्या कारणे सर्वव्यापी अभियाना द्वारे प्लास्टिक निर्मूलन करणे अगत्याचे आहे .त्या कामी शालेय विद्यार्थी हा खरा स्वच्छतेचा दूत होय असे प्रतिपादन किरणकुमार मोरे यांनी केले .
 श्रीवर्धन मधील नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छता व प्लास्टिक बंदी या विषयी मार्गदर्शन करतांना मुख्याधिकारी किरणकुमार मोरे  यांनी विद्यार्थी वर्गाशी  संवाद साधला . पर्यावरण पूरक धोरण , स्वच्छतेचे महत्त्व , प्लास्टिक बंदी व कापडी पिशवी चा नियमित वापर या बाबी विषयी बोलतांना विद्यार्थ्यांनी आपल्या पालकां कडे  कापडी पिशवी वापरण्याचा आग्रही भूमिका घेतल्यास त्याचा निर्णायक परिणाम होऊ शकतो .प्लास्टिक चे विघटन अशक्य आहे त्या पासून विविध पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे .तुम्ही खाऊ खाल्या नंतर त्या खाऊ ची प्लास्टिक पिशवी रस्त्यावर टाकू नका .ती नगरपरिषदेने ठेवलेल्या कचरा पेटीत टाकल्यास आपले श्रीवर्धन शहर स्वच्छ व सुंदर दिसेल .असे मोरे यांनी सांगितले 

तुम्ही तुमचा शाळा परिसर स्वच्छ ठेवावा व शाळेतील निर्माण होणारा ओला व सुका कचरा यांचे  वर्गीकरण करून नगरपालिकेला द्यावा .बाजारात जाताना नियमित कापडी पिशवी चा वापर करा .दुसरे कोणी प्लास्टिक पिशवी वापरत असेल तर  त्याला तुम्ही सांगा कापडी पिशवी वापरून पर्यावरण सुधारण्यासाठी मदत करा .अन्यथा नगरपरिषद तुम्हाला  प्लास्टिकची पिशवी वापरल्यास रुपये 5 हजार चा दंड करू  शकते  असे किरणकुमार मोरे यांनी सांगितले .श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या 526 विद्यार्थ्यांना कापडी पिशवीची वाटप करण्यात आली .सदरच्या कार्यक्रमासाठी  महिला आर्थिक विकास महामंडळा च्या  मीनल साळवी ,समनव्यक अर्जुन राठोड  ,सागर औटी ,संदीप सोनावणे व अशोक नलावडे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा