म्हसळ्याच्या राजाला आज पोलीसांनी दिलानिरोप ; ५ व्या वर्षाचा झाला सांगता समारंभ



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
पुढल्या वर्षी लौकर या म्हणत वाजत गाजत पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांचे सर्व कुटुंब यानी पोलीसांच्या या म्हसळ्याच्या राजाची मिरवणुक S.T. स्टँड ते हिंगुळ डोह अशी काढून निरोप दिला. मागील वर्ष ही सरले आणि याही वर्षी म्हसळा पोलीसानी आपल्या राजाला पावसाची संततधार डोक्यावर घेत आनंदाश्रूनी निरोप दिला. म्हसळा पोलीस घरगुती आणि सामाजिक अशा स्तरांवर साजारा होणाऱ्या सोहळ्यासाठी सज्ज होते ." सद्रक्षणाय , खल निग्रहणाय" या वचनाला जागत म्हसळा पोलीसानी जनतेच्या श्री गणपतीची स्थापना सुखरुप केली व नंतरच आपल्या राजाची स्थापना केली त्याच प्रमाणे काल अनंत चतुर्थदशीचे बहुतांश गणपती विसर्जन काल पूर्ण झाल्यावर आज म्हसळा पोलीसानी विसर्जन मिरवणुक काढली मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी होती गणपती बाप्पा येणार म्हटलं की, सर्वांमध्ये उत्साह संचारतो. मग जोपर्यंत बाप्पा आपल्या घरात असतो तोपर्यंत सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. आज जड अंतकरणाने म्हसळा पोलीसानी व स्थानीकानी आपल्या लाडक्या म्हसळ्याच्या राजाला निरोप दिला. म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक अे.जी. खेडकर, सब इन्स्पेक्टर दिपक डूस यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यकांत भोसले, गणेश भोईर, सुर्यकांत जाधव , वैभव पाटील, मंगेश पाटील, शामराव करोड व अन्य कर्मचाऱ्यानी १२ दिवस नियोजन बध्द कार्यक्रम राबविला.

" म्हसळा पोलीस स्टेशन मधील श्री गणेश स्थापना ५ वर्षापूर्वी डॉ. महेश्वर रेड्डी , पोलीस अधिक्षक, असताना सुरवात झाली. म्हसळा पोलीस व स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने म्हसळ्याचे राजाची सेवा करतात "

1 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم

नक्की वाचा