केंद्रप्रमुख शिक्षक सुनिल पवार यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

केंद्रप्रमुख सुनिल पवार यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना केंद्रीय आयुष मंत्रालय राज्य मंत्री श्री.श्रीपाद नाईक व मान्यवर


देशाची सुसंस्कृत बलवान पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत - केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

 अविष्कार सोशिअल अँड एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्यामार्फत 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त देशात व राज्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे औचित्याने म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलटे या शाळेतील पदवीधर शिक्षक तथा नेवरूळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सुनिल धर्माजी पवार यांना दि.15 सप्टेंबर रोजी अविष्कार फाउंडेशन चा 2019 चा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार केंद्रीय आयुष मंत्रालय भारत सरकार मंत्री श्री.श्रीपाद नाईक यांच्या शुभहस्ते गोवा राज्यातील इन्स्टिट्यूट मेंझिस ब्रागाझा, पणजी येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
     यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक करून समाजाच्या जडणघडणित शिक्षकांचे योगदान काय असते याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे असे सांगून 
देशाची सुसंस्कृत बलवान पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत असे गौरवोद्गार केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. तसेच आपण कितीही मोठे झालो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करीत असलो तरी आपल्या शिक्षकांना आणि शाळेला सतत आठवणीत ठेवले पाहिजे असे सांगितले. त्याचबरोबर संपूर्ण देशातील विविध राज्यांमधील महत्वपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अविष्कार फाउंडेशन मार्फत पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आणि अनेक राज्यातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणल्याबद्दल अविष्कार फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

    सुनील पवार हे केलटे येथील शाळेत विद्यार्जन करीत असून सन 2010-11 व सन 2011-12 ला सलग 2 वर्षे रायगड जिल्ह्यात प्रथम येऊन साने गुरुजी स्वच्छ व सुंदर शाळा हा पुरस्कार मिळाला आणि शाळेला 50,000/-रु चे 2 वेळा बक्षीस जिल्हा परिषद कडून मिळाले आहे.
   अखिल म्हसळा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळाचे उपाध्यक्ष अशा सामाजिक संघटनांच्या पदावर तसेच रायगड जिल्हा परीषद शाळा केलटे येथील मुख्याध्यापक सुनिल पवार यांना अविष्कार फाउंडेशन संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाले बद्दल अखिल शिक्षक संघटना परीवारातर्फे तसेच केलटे ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे शिक्षक सुनिल पवार यांचे कौतुक होत असून शुभेच्छा दिल्या जात आहेत.  
    यावेळी पुरस्कार वितरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष मंत्रालय राज्य मंत्री श्री.श्रीपाद नाईक, संचालक कला आणि संस्कृती गोवा सरकार श्री.गुरुदास पिलरनेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जेष्ठ चित्रकार संजय हरमलकर, अविष्कार फाउंडेशन संस्थापक संजय पवार, संस्था केंद्रीय कार्यकारी सदस्य कोकण विभाग विजय केळकर, अविष्कार फाउंडेशन गोवा प्रदेशाध्यक्ष प्रदिप नाईक, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संतोष भोसले, मुंबई विभागीय अध्यक्ष मेजर प्रा.अशोक नवलकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज पाटील, अखिल गोवा राज्य शिक्षक संघटना राज्याध्यक्ष श्री.प्रकाश गावकर हे मान्यवर उपस्थित होते त्याच बरोबर हा पुरस्कार स्वीकारताना शिक्षक सुनिल पवार यांच्या समावेत म्हसळा तालुक्यातील माजी गटशिक्षणाधिकारी तथा केंद्रप्रमुख गजानन साळुंखे, केलटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकुंद बोर्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरवठणे गण अध्यक्ष सतिश शिगवण, अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते, आदी मित्रपरिवार उपस्थित होते. 
  

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा