देवघर ग्रंपंचायतीमध्ये लाखोंचा गैरव्यवहार : ग्रामस्थांचे ग्रामविकास राज्य मंत्र्याना साकडे.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील देवघर ग्रंपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असून, ग्रंपंचायतीमध्ये मागील दोन वर्षात झालेल्या सर्व व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी यासाठी देवघर गावातील ग्रामस्थांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांना गटविकास अधिकारी म्हसळा यांच्या मार्फत निवेदन दिल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ अमित महामुनकर यानी सांगितले.देवघर ग्रंपंचायत आणि गैरव्यवहार हे काही नवीन सूत्र नसून या आधी देखील विकास कामांची निविदा काढण्याआधीच काम पूर्ण झाल्याचा प्रताप याच ग्रामपंचायत मध्ये पाहावयास मिळाला होता.ग्रामसभेच्या नावावर या गावात अजूनही ग्रामपंचायत नागरिकांमध्ये सभ्रम निर्माण करत असून ग्रामसभेपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप होत आहे. भ्रष्टाचाराचे तक्रारींत देवघर ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या रोजगार हमी योजनेमध्ये मोठ्या प्रामाणात भ्रष्टाचार सुरू असून अपूर्ण कामांची सर्व रक्कम अदा करण्यात आली आहे.रा.जी.प शाळा ढोरजेला 40 हजारांचा प्रोजेक्टर (ज्याची खरी किमत 30 हजार आहे) त्याचे बिल अदा करून,दोन हजारांच्या डीव्हीडी प्लेयर साठी नऊ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे.40 हजाररूपये खर्च करूनही विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून अद्याप वंचित असल्याचे ग्रामस्थ अमित महामुनकर यांनी निवेदनात म्हटले आहे .पथदिवे,झाडे झाडे लावा झाडे जगवा या योजनामध्ये देखील मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.सदर पत्र ग्रामस्थांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांना म्हसळा पंचाईत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एन. प्रभे यांच्या मार्फत दिले, यावेळी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले,अमित महामुनकर,सूर्यकांत तांबे,सुनील शिंदे,गोविंद पाखड, गोविंद बोर्ले यांच्यासहित अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सामान्य ग्रामस्थांचा ऐकून घेत नाही,कामांबाबत काही विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थ व अमित महामुनकर यांनी केले. मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात असणार्‍या या ग्रामपंचायतीचे त्यांच्यात ताब्यात असणार्‍या पंचायत समिति व जिल्हापरिषद मधील अधिकारी यांच्या मार्फत निपक्शक्ष चौकशी करतील की, ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारला अधिक चालना देतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा