शिवशंभो प्रतिष्ठान बेलवाडी च्या साखरचौथ गणरायाचे आगमन



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मुरूड-जंजिरा- बोर्ली शिवशंभो प्रतिष्ठान बेलवाडी,सालाबाद प्रमाणे या वर्षीही बेलवाडीचा राजा साखरचौथ गणोशोत्सव मंडळाच्या बाप्पांची स्थापना ग्रुप ग्रामपंचायत भोईघर, उपसरपंच मा.सौ.ज्योतीताई वणे  आणि माजी सरपंच श्री.विश्वास गोणबरे तसेच शिवशंभो प्रतिष्ठानचे युवा यांचा हस्ते पार पडली. बेलवाडी गावाच्या समाज सभागृहात येथे या बाप्पाची स्थापना केली जाते. मंडाळाचे हे ४ वा वर्ष आहे.

महाराष्ट्राच्या पेण, उरण, पनवेल आणि मुरुड या तालुक्यांतील प्रामुख्याने आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. काही साखरचौथ गणपती अडीच ते पाच दिवसांचेही असतात. या साखरचौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात. याचवेळी २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा