सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाडे तत्वावर देण्यास काढले असताना शासनाच्या राज्यकारभारात शिवसेना करते काय ?खासदार अमोल कोल्हेचा सवाल.


महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाडे तत्वावर देण्यास काढले असताना शासनाच्या राज्यकारभारात शिवसेना करते काय ?खासदार अमोल कोल्हे यांचा शिवसेनेला शिवस्वराज्य यात्रेत खडा सवाल.

मराठी माणूस पेटला तर तो लवकर विझत नाही हे लक्षात ठेवा - खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा सरकारला इशारा

● शिवस्वराज्य यात्रेचे म्हसळाकरांनी केले जल्लोषात स्वागत.

● खासदार कोल्हे यांनी आदिती तटकरे यांचे नाव भावी आमदार असे म्हणत जाहीर केली श्रीवर्धन मतदारसंघाची उमेदवारी.

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी गड, किल्लेतील एक एक दरवाजा, एक एक बुरुज जपण्यासाठी त्यांच्या जीवाचे बलिदान दिले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात भाजपसेना युती सरकारने महसुल गोळा करण्यासाठी 150 गड किल्ले लग्न सोहळे, पार्टी करण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे असे असताना या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवुन सत्तेत पाय रोवता ती शिवसेना आता गप्प कशी ? असा प्रश्न शिरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार,शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हसळा येथे जाहीर स्वागत यात्रेला संबोधित करताना उपस्थित केला. 
 राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवुन सत्तेवर आलेल्या सेना भाजपच्या सरकारला आता राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला आहे. महाराष्ट्र शासनाचे सत्तेत पुन्हा आम्हीच येणार-येणार सांगत असलेले भाजप, शिवसेना पक्षाचे नेते, मंत्री महाराष्ट्रात "महाजनादेश यात्रा","जन आशिर्वाद यात्रा" काढुन फिरत आहेत त्यांची खिल्ली उडवताना यांना शिवाजी महाराजांचे नाव का आठवले नाही. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या जन्म आणि कर्म भूमीतले तीन मावळे देशातील संसदेत निवडून गेले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांंची जन्मभूमी असणाऱ्या'शिवनेरी' मधुन मी खासदार अमोल कोल्हे,शिवाजी महाराजांची पहिली राजधानी 'राजगड' मधुन सुप्रियाताई सुळे तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेल्या 'रायगड' मधुन खासदार सुनिल तटकरे निवडून गेले आहेत म्हणुनच आम्ही "शिवस्वराज्य यात्रा"काढली आहे आणि तो अधिकार फक्त आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. संपुर्ण देशात मोदी लाट असताना हा इतिहास घडला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
म्हसळा तालुका शहरात खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा सायंकाळी उशिरा आली तरीही मोठया गर्दीत स्वागत कर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता.पाभरे फाटा ते म्हसळा दिघी नाका येथ पर्यंत वाजतगाजत भव्यदिव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या वेळी त्यांचे समावेत खासदार सुनिल तटकरे,प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे,पक्षाच्या महिला प्रवक्त्या रुपाली चाकणकर,आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, श्री शेख,प्रसिध्द वक्ते अमोल मीटकरी,तालुका अध्यक्ष समीर बनकर,नाझीम हसवारे आदी मान्यवर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी युती सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचेवर सडकून टीका करताना महाजनादेश यात्रेत मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री यावर कोल्हे म्हणतात फडणवीस साहेब पाच वर्षे राज्याची खुप वाट लावलीत आता पुन्हा येवु नका तर सेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना टोला मारताना आता जनआशिर्वाद मागण्याची आठवण झाली जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती,पूरपरिस्थिती होती तेव्हा मातोश्री वरून खाली आला नाहीत. राज्यात दुष्काळी भागात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, महागाई, बेरोजगारी, प्रदूषण वाढले असताना आता आदित्य ठाकरे बेरोजगार मुक्त महाराष्ट्र, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करायचा आहे असे म्हणतात मग मागील पाच वर्षे सरकारमध्ये राहुन काय केलात. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आर.आर पाटील, आबांनी वर्षाला 13 हजार अशा पाच वर्षात 65 हजार युवकांना नोकऱ्या मिळाली आता या सरकारने जेमतेम 4500 हजार जागा भरताना त्यात ही ओबीसी आणि एसटी च्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय केला असल्याचे निदर्शनास आणले तर वनसंरक्षक भरतीत शारीरिक चाचणी परीक्षेत अनुपस्थित असलेल्या दोन उमेदवारांची फायनल यादीत नाव हे कशाचे धोतक आहे असाही कोल्हे यांनी सरकारच्या कारभारावर  टिका करताना निदर्शनास आणुन दिले. बेरोजगारी,1600 शेतकऱ्यांंची आत्महत्या, महागाईच्या या जमाण्यात 12 कोटीच्या महाराष्ट्रातील जनतेला सेना भाजपला उत्तर द्यावे लागेल.
महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट,दुष्काळी आणि पुरपरिस्थिती झाली तेव्हा पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब 89 वर्षाचे असताना तरुण होऊन संकटाला धावून गेले. मात्र ज्यांनी राज्याची जबादारी घेतली आहे ते मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरने सफर करीत पूरपरिस्थितीची पहाणी करून निघुन जातात तर जलसंपदा मंत्री महाजन हे होडीतून सेल्फी काढतात तर महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील लोक जाब विचारलायला गेले म्हणुन चल हट बाजुला हो म्हणतात यांना आता राज्यातील सत्ता चालविण्याचा नैतिक अधिकार राहिला नसुन आता कोणतीही लाट राहिलेली नाही देशाचे आणि राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात.कलम 370,ट्रिपल तलाक, राममंदिर आदी प्रश्न घेवुन मोदी लाट उसळली होती तरीही रायगड जिल्ह्यातील जनतेने खासदार सुनिल तटकरे यांना आशिर्वाद दिला याचे आभार मानताना जेथे तरुणांच्या नोकरीचा विचार केला जात नाही,शेतकरी आत्महत्या करतात,शहीदांच्या पत्नीचा अपमान केला जातो तेव्हा तरुणांनी सावध होऊन या सरकारचा होणाऱ्या विधान सभा निवडणुकीत दारुण पराभव करून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार निवडून आणा अशी भावनिक साद खासदार कोल्हे यांनी उपस्थित जणसमुदायाला केली.याच वेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा ही खरपुस समाचार घेतला ज्यांनी महाराष्ट्रातील राजकीय जीवनात 50 वर्षे लोकहिताचे कार्यभार केले त्यांना तुम्ही काय केलेत असे विचारता तेव्हा तुमच्या बाबत मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावला आहे. आमचा स्वाभिमानाला डीवचु नका एकदा का मराठी माणूस पेटला तर तो लवकर विजत नाही हे लक्षात ठेवा असाही इशारा खासदार कोल्हे यांनी जाहीर सभेत दिला. शेवटी सांगताना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता जवळपास लागु होण्याची वेळ आली आहे तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्याचे भाड्याच्या बाबतीत जि.आर.बदल केला नाही तेव्हा या सरकारचा हेतु ओळखून सेना भाजपच्या सरकारला खाली खेचा असे जाहीर आवाहनही खासदार कोल्हे यांनी केले. सभेला श्री शेख, खासदार सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा