म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत डॉ. स्वामी रंगनाथन् यांची जयंती साजरी


( म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत आज डॉ. स्वामी रंगनाथन् यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. वसंतराव नाईक कॉलेजचे ग्रंथपाल व सा.वाचनालयाचे संचालक रायप्पा मशाळे यांच्या हस्ते डॉ. स्वामी रंगनाथन् यांचे प्रतिमेचे व अध्यक्ष संजय खांबेटे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सचिव अशोक काते, बाबू शिर्के, सुशिल यादव , अरुण जंगम, श्रीकांत बिरवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते डॉ. स्वामी रंगनाथन् यांचा जन्मदिन हा दिवस "ग्रंथपाला दिन" म्हणून साजरा केला जात असल्याने ग्रंथपाल उदय करडे, सायली चौगुले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी डॉ. रंगनाथन् यांच्या बाबत माहिती देताना रंगनाथन यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई)तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 12 ऑगस्ट 1892 साली झाला शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले. ग्रंथालय व ग्रंथपालांसह ते सर्वांनाच आदर्श ठरले असेही माशाळे यानी सांगितले.ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या खर्चाने रंगनाथन याना ‘स्कूल ऑफ लायब्ररी यनशिप’ साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२८ रोजी त्यांनी 'मद्रास ग्रंथालय संघाची' स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली.सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन् यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला याची मशाळे यानी आठवण करून दिली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा