सार्वजानिक वाचनालयात गुरुपोर्णिमा साजरी


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.  त्याच प्रमाणे म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालया तर्फ ग्रंथ हेच गुरु या संकल्पनेतून विविध ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यावेळी
ज्ञानदेव अनाप कृषि अधिकारी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. आणि श्री. जी. जी. पारवे यांनी प्रतिमेचे आणि ग्रंथांचे पूजन केले यावेळी ग्रंथपाल ऊदय करडे, सायली चोगुले, धनश्री नाक्ती, प्रगती केदार, सुजय कुसाळकर, पी.एम.पाटील, विशाल पोळेकर वगैरे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा