पावसाळ्यातील कडक उन्हाने म्हसळाकरांसह रायगडकर तापले


संजय खांबेटे  म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्हयांतील भातशेतीची बहुतांश लावणी संपली आहे, मंगळवार दि.१६ जुलै पासून आज शुक्र दि. १९ पर्यंत जिल्ह्यात पावसाने पाठ फीरवल्याने भात पिके पिवळी पडण्याचे भीतीने शेतकरी चिंताग्रस्त व उकाड्याने हैराण झाल्याने नागरीक बेजार झाले आहेत. जिल्ह्यांत आजपर्यंत सरासरी १५८८.७५ मि.मि. पर्जन्यमान आहे . मागील वर्षी पेक्षा ५o३.३५. मि.मि. ने अखापही कमी पर्जन्यमान असताना मागील चार दिवसांत सरासरी केवळ १९.३५ मि.मि. पावसाची नोंद आहे. हवामान पाहता ३१ अंश सेल्सिअस कमाल तर किमान २७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.आद्रतेचे प्रमाण ७९ ते ८४ आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे २ .५ आणि ३ अंशांनी अधिक होते.
हवामानातील आद्रतेमुळे अनेक लोकाना अस्वस्थ वाटत आहे. बुधवार, गुरुवार व आज शुकवारी सलग तीन दिवस उन्हाच्या माऱ्याने नागरीक बेजार झाले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा