संजय खांबेटे : म्हसळा
माकडे , वानर, केलट या जंगलातील जाती गेले १५-२० वर्ष शहरात राजरोसपणे वावरू लागली आहेत. त्यानी शहरांतील
परसबागा प्रथम लक्ष केली . त्यामध्ये केळी, पपई, आंबे, फणस ,जांभूळ अशी फळझाडे व नंतर नारळाचे झाडांवर त्यानी अपले लक्ष केंद्रीत केले. बहुतांश मालकानी अन्य झाडे तोडल्यामुळे माकडानी नारळ लक्ष केले त्यामुळे बहुतांश घरमालकानी परसबागेतील कल्पवृक्ष ( नारळ) संबोधीले जाणाऱ्या नारळावरही माकडानी उच्छाद मांडल्यामुळे अखेर मालकानी कुऱ्हाड लावणे पसंत केले. शहरातील कन्याशाळा, विद्यानगरी, तांबटआळी, ब्राह्मण आळी, जैन कॉलनी , कुंभारवाडा, गौळवाडी, वाऱ्याचा कोंड, नवा नगर, बाजारपेठ या सर्वच ठिकाणी माकडानी आपला संचार वाढविला आहे. शहरांतील बहुतांश घरांची कौले, कोने, दूरध्वनी व T.V. केबल वरून घुडकूस घालत कौले, कोने व अन्य नुकसान करीत आहेत. तालुक्यातील बारमाही पिकाखाली कोळे, कोंझरी, कोळवट,भापट, चिरगाव, सावर, देवघर, देहन , घूम,नेवरुळ, रूद्रवट, पाभरे, निगडी, तोंडसुरे, या परीसरांतील बागायतींचा माकडानी पूर्णपणे नायनाट केला आहे.घरांच्या भिंती आणि छप्परामधील पोकळीतून जावून घरातील खाद्यपदार्थही खावू लागले आहेत. घरांच्या कौलारू छप्परांचेही या माकडांच्या उड्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. माकडांच्या उपद्रवामुळे घराजवळची आंब्याची धरती झाडे, कलमे, माड तोडण्याची वेळ लोकांवर आली आहे. परिणामी आर्थिक नुकसानही लोकांना सोसावे लागत आहे.
पूर्वी फटाके लावले किंवा डब्याचा आवाज केला तरी माकडे घाबरून किमान काही दिवस तरी परांगदा होत असत. मात्र, आता याही गोष्टींना माकडे सरावली आहेत. एकट्या दुकट्या महिलांच्या अंगावर जाण्यास माकडे मागे पुढे पाहत नाहीत.
-श्रीमती ज्योती आगलावे
वनखात्याने आता माकड उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे. एकतर माकड पकड मोहीम राबवा किंवा माकडांना पुन्हा जंगलात परतवण्यासाठी काहीतरी उपाय आखा, अशी मागणी शेतकरी बागायतदारांकडून होवू लागली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कौलारू घरांची संख्या अधिक आहे. मात्र माकडे दणादण उड्या मारून घरांची कौले, कोने मोठ्या प्रमाणावर फोडू लागले आहेत.
-सदा काते, सावर म्हसळा.

إرسال تعليق