गजानन दिघिकर व अशोक सावंत निवृत्त : महसुल विभागाकडून सत्कार


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील आंबेत येथील तलाठी श्री.गजानन पद्मा दिघिकर व कोतवाल श्री अशोक सावंत   हे दोघेही नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्याना निरोप समारंभ व सत्कार  तहसीलदार शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .यावेळी मंडळ अधिकारी मंगेश पवार,अ.का. प्रकाश भोईर, पुरवठा अ. कारकून एन्.बी. सानप ,महेश रणदिवे, श्रीमती तृप्ती साखरे, सरिता लिमकर, ए.ए.ठमके, जयंता भस्मा, तलाठी एस.जे.विरकुड, गजानन गिऱ्हे, एस. के. शहा, गोरखनाथ माने, श्रीमती पूनम कारंडे, दमयंती पाटील, भाऊ पवार, कैलास पाटील, जितेंद्र शेळके, बाँड रायटर जाधव, पीडी पागीरे,पी.एच.कळंबे, कोतवाल श्रीमती भारती खारगावकर , विद्या कुळे, राजकुमार तांबे, अमोल शिगवण, अरविंद पवार, भास्कर नाक्ती ,केशव कांबळे, दिपक चव्हाण, पांडुरंग कांबळे, मधुकर वाढवळ , लहू नाक्ती,बाळाराम उभारे,व कर्मचारी वृंद, अव्वल कारकून,लिपिक, तलाठी,शिपाई, कोतवाल कर्मचारी व इतर कार्यालय कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी तहसीलदार शरद गोसावी यांनी व अन्य कर्मचाऱ्यानी त्यांचे कामाचा गौरव केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा