श्रीवर्धनला वादळी पावसाचा तडाखा रात्रभर वीजपुरवठा खंडित ; झाडे उन्मळली

श्रीवर्धननला वादळी पावसाचा तडाखा रात्रभर वीजपुरवठा खंडित ; झाडे उन्मळली , घरांचे नुकसान ; दिघी लॉन्चही बंद 

श्रीवर्धन : अभय पाटील
 श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन , दिवेआगर , वडवली , दिघी , वेळास , भरडखोल , आदगाव सर्वे या भागामध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाच्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली . या वादळी पावसामुळे बुधवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाला आहे . तसेच जोराच्या वा - यामुळे बोर्लीपंचतन व वावेपंचतनमध्ये झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . वादळी वाच्यामुळे दिघी ते आगरदांडा लाँच व जगल जेट्टी सेवा दुपारनंतर बंद करण्यात आली होती . अरबी समुद्रामध्ये वायु चक्रीवादळ निर्माण झाले आहे व त्याची कुच गुजरातच्या दिशेने सुरू असताना त्याचा फटका श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीला सौम्य स्वरूपात बसल्याचे चित्र आहे . तालुक्यातील बोलपंचतन , दिवेआगर , वडवली , दिघी , वेळास , भरडखोल , आदगाव , सर्वे या भागामध्ये बुधवारी सायंकाळीच वाऱ्याचा वेग वाढला होता . तर रात्री पावसाने सुरुवात केल्यानंतर सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित झाला . त्यामुळे नागरिकांना रात्र अंधरातच घालवावी लागते . बोर्लीपंचतन येथील वांजळे गावच्या मार्गावर भले मोठे झाड बोर्लीपंचतन येथील प्रफुल्ल विजय नांदवडकर यांच्या घरावर उन्मळून पडले . या घरातील राहणारे नांदविड़कर कुटुंबीय कामास्तव दिवेआगर येथे राहात असल्याने कोणासही इजा झाली नाही . तसेच बोर्लीपंचतन - श्रीवर्धन मार्गावरील वावेपंचतन गावानजीक पहाटेच्या सुमारास झाड पडल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती . परंतु , गावक - यांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आले . बोलपंचतन येथील झालेल्या घराच्या नुकसानीचा पंचनामा बोलपंचतन तलाठी सजा पवार याांनी केला . रात्री खंडित झालेल वीजपुरवठा गुरुवारी दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता . त्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा