म्हसळा शहरात पाणी- बाणी : नगरपंचायती विरुध्द ग्रामस्थ एकवटले
संजय खांबेटे :म्हसळा
शहराला पाणी टंचाईने ग्रासले असुन सतत चार वर्ष टंचाईची झळ भासत असतानाच शहरांतील नागरिक मात्र सहनशील तेने गेली १० वर्ष पाभरा धरणातील पाण्याची वाट पहात आहेत. शहरांतील बहुतांश जनता पाणी टंचाईला कंटाळली आहे.आता मात्र नगरपंचायत प्रशासनाचे Ceo ना जनता जाब विचारणार आहे.नगरपंचायत प्रशासानासहित राज्य शासनापर्यंत याबाबत जाब विचारण्यासाठी शहरातील नागरिकांची सभा घेऊन" पाणी संघर्ष समिती म्हसळा" ची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार सुशील यादव यांची एक मतानी निवड करण्यात आली. म्हसळा शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी नागराध्याक्षांसाहित एकही नगरसेवक पुढाकार घेत नसल्याचे लक्षात येताच म्हसळा शहरातील पत्रकारांनी पुढाकार घेत नागरिकाना आवाहन करून एकत्र केले व यातूनच पाणी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली . म्हसळा शहरात कायमस्वरूपी पाणी योजना कार्यान्वयित होत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धारच या सभेमध्ये सुशील यादव यांनी व्यक्त केला. सदर समितीच्या सचिवपदी नदीम दफेदार, सहसचिवपदी गणेश हेगिष्टे, खजीनदारपदी कांतीलाल जैन , तर सल्लागार पदी, ज्येष्ट पत्रकार संजय खांबेटे यांची निवड कण्यात आली. सदस्य म्हणून सुरेश कुडेकर,अनिकेत पानसरे, पत्रकार महेश पवार, उदय कळस, बाबू शिर्के, यतीन करडे यांची निवड करण्यात आली आहे.
म्हसळा शहरात १० वर्षापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना तत्कालीन पालक मंत्री सुनील तटकरे यांनी १ कोटी ८४ लाख रकमेची योजना मंजूर करून आणली होती परंतु तत्कालीन कंत्राटदार ,सरपंच , सदस्य, पाणी समिती अध्यक्ष यांच्या भोंगळ व भ्रष्टाचारी कामामुळे हि योजना रखडली. त् योजनेचे दोन वेळा भूमिपूजन झाले परंतु या योजनेचे दोन थेंब
पाणी सुध्दा म्हसळा शहरवासियांना अद्याप पर्यंत मिळाले नाही. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे परंतु पाण्याच्या योग्य नियोजना आभावी गेले चार वर्ष शहरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यावर्षी तर भीषण पाणी टंचाई चा सामना शहर वासीयाना करावा लागत आहे. नगर पंचायत ने शहराला पाणी पुरवठा होणारे मुख्य पाण्याच्या स्त्रोतातील पाणी संपल्यामुळे अनेक ठिकाणी बोअर वेल मारून हे पाणी मुख्य टाकीमध्ये साठवून पाणी पुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला खरा परंतु हे बोअर वेलचे पाणी दूषीत व पिण्यास आयोग्य आसल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परीणाम करू लागले आहे. संघर्ष समितीचे बैठकीत या योगेश करडे, सुरेश जैन, गौरव पोतदार,प्रवीण बनकर, प्रदीप कदम, मंगेश म्हशीलकर, संतोष उद्धरकर, महमद रफी घरटकर, महावीर जैन , विशाल सायकर, मुकेश जैन यांच्या सहित अनेक प्रतिष्ठीत नागरीकानी नगरपंचायतीच्या पाणी पुरवठ्यावर आभ्यासू मत प्रदर्शित करून पाणी योजना कार्यान्वीत होई पर्यंत आंदोलन सुरु ठेवणे बाबत भूमिका घेतली.

إرسال تعليق