खाडीत तरुणांचा अपघाती मृत्यू


श्रीवर्धन : संतोष सापते

श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे येथे कांदळवण लागवड करतांना  दिं 10 मे 2019 ला तरुण पाण्यात पडून मरण पावला आहे . काळींजे येथे वनविभागाच्या वतीने कांदळवणाची लागवड करण्यात येत आहे त्या कामासाठी काळींजे येथील समुद्र किनारी कामकरून  होडीतून परतत आसताना एक 23 वर्षाचा तरूण त्या खाडीमध्ये पडून बुडाला होता अखेर 20 तासा नंतर त्या तरूणाचा मृतदेह काळीजे येथील खाडीमध्ये सापडला.
       याबाबत सविस्तर असे काळींजे येथिल खाडी किणारी वनखात्याच्या मार्फत कांदळवणाची लागवड केली जात आहे त्या ठिकाणी दरराज चार ते आठ मजुर कामगार काम करीत असतात समुद्राच्या ओहटीच्या वेळी काळींजे येथील असलेलेल्या बेटाच्या ठिकाणी कांदळवनाचे काम सुरू आहे दिं 9 मे 2019 रोजी समुद्राच्या भरतीच्यावेळी काम करून होडीतून परतत असताना खाडीमध्ये होडी सरकवत असताना मयत जिगर शंकर पडवळ वय 23 रा. शिरवली  पो वडवली ता. माणगाव या ठिकाणचा रहीवाशी असलेल्या तरूणाने रूतलेला होडीचा चिखळामध्ये रुतलेला वल्ला काढण्यासाठी (माहीती  सांगितल्या प्रमाणे) उडी मारली मात्र तो तरूण बुडून बेपत्ता झाला भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जिगर याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा  मृत्यदेह दुसऱ्या दिवशी सकाळी 07:30 वा.च्या सुमारास काळींजे खाडीच्या किनारी पाण्यामध्ये आढळून आला या बाबत श्रीवर्धन पोलीस ठाणे यांनी आ. मृ. र नं 8 /2019 दाखल करण्यात आला आहे .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा