म्हसळा उप- कोषागार कार्यालयाला दिवसभर बंद: टाळे ठोकून उप- कोषागार आधिकाऱ्याची दांडी.


संजय खांबेटे : म्हसळा 


प्रत्येक जिल्हयाला कोषागर  आणि तालुका पातळीवर उप- कोषागर असते. या कार्यालयांतून शासनाचे आर्थिक व्यवहार होत असतात. जिल्हा पातळीवरील कोषागराचा प्रभारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असतात तर तालुका पातळीवरील उप- कोषागर कार्यालयाचा प्रभारी अधिकारी म्हणून तहसीलदार असतात व उप- कोषागार कार्यालयांत उप- कोषागार अधिकारी कार्यरत असतो . म्हसळा तालुक्याचे
उप- कोषागार कार्यालयाल आज गुरवार  दि. ३० मे ला दिवसभर बंद आसल्याचे आढळले. त्यामुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयांचे विविध आर्थिक व्यवहार ठप्प झाले. वास्तविक पहाता कार्यालयीन निर्देशानुसार कार्यालयीन वेळ , जेवणाची वेळ असे निर्देशीत असताना उप- कोषागार अधिकाऱ्याने प्रभारी वरीष्ठ अधिकारी म्हणून तहसीलदार म्हसळा यांची कोणतीही परवानगी न घेता कार्यालय दिवसभर बंद ठेवले कसे हा म्हसळयातील विविध कार्यालयांतून चर्चेचा विषय ठरला आहे.उप- कोषागार कार्यालयात वेतन व ईतर भत्ते, शासकीय वसुली, बजेट नियंत्रण,मेडीकल बिले, रिएंबर्समेंट, सर्व प्रकारचे स्टँप, अंशदान,पेन्शन , स्टॅंप वरील कमीशन अशी शासकीय आर्थिक कामे केली जातात आज उप- कोषागार आधिकाऱ्याने दिवस भर टाळे ठोकून कार्यालय बंद का ठेवले याची चौकशी होणे व संबधीत अधीकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे.



म्हसळा उप- कोषागार कार्यालयाबाबत चौकशी केली असता आज दिवसभर कार्यालय उघडले नसल्याचे समजले, म्हसळा उप- कोषागार अधिकारी म्हणून मा.रा.पवार कार्यरत आहेत. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे.
शरद गोसावी , तहसीलदार म्हसळा.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा