श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन पंचायत समिती यांनी १ ऑक्टोबर २०१८ ते ३० जुन २०१९ या कालावलीसाठी पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला . हे जरी खरे असले तरी तो फक्त कागदावरच राहीला आहे . सध्यस्थितीमध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये आठ गावामध्ये पाण्याची भिषण टंचाई बसत आहे .याकडे श्रीवर्धन पंचायत समिती डोळेझाक करत असल्याचे आरोप पाणी टंचाई ग्रस्त नागरीकांकडून केले जात आहे . श्रीवर्धन तालुक्यामधील साक्षीभैरी , कोंढे पंचतन , शेखाड़ी , साखरी , गुळचे चापवली , नागलोला , आदगाव , धनगरमलई , या आठ गावामध्ये पाण्याची भिपणटंचाई आहे . या बाबत तेथील स्थानिक नागरिकांनी पंचायत समितीला लेखी तक्रार देऊन सुध्दा श्रीवर्धन पंचायत समितीचे प्रशासन हे त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे . लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीला सुध्दा प्रशासन कराची टोपली दाखवत आहे . त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . जर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सुध्दा पंचायत समिती प्रशासन केराची टोपली दाखवत असेल तर मग सर्वसामन्य जनतेला भेडसावणारे प्रश्न कोणासमोर मांडणार हा प्रश्न सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे . लोकप्रतिनिधी लोकांची समस्या प्रशासनाकडे मांडताना जर उध्दटपणे उत्तरे व मनमानी कारभार प्रशासन करत असेल तर जनतेचे प्रश्न नेमके कोण साडविणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकासमोर भेडसावत आहे , सध्या उन्हाळ्याचा काळ सुरु झाला असून तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाडयांना पाणी टंचाई मोठया प्रमाणामध्ये तर काही गावा व वाइवाना काही प्रमाणामध्ये पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे . जनतेच्या व लोकप्रतिनिधीच्या प्रश्नांना सध्या प्रशासने सफसेल केराची टोपली दाखवत असल्याने दोन दोन पाण्याच्या हंडयासाठी माहेलावगीला कित्येक मैलभर पायपीट करावी लागत आहे . काही ठिकाणी पूर्ण रात्रभर जागून पिण्याचा पाणी जंगलामध्ये जाऊन रात्रीच्या वेळी पायपीट करून आणावे लागत आहे . हंडाभर पाण्यासाठी अथक परिश्रम महिलावर्गाला करावे लागत आहे . त्यामुळे महिलावर्गही त्रस्त झालेला दिसत आहे . श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकुण ७२ गावे व वाड्या असून त्यासाठी श्रीवर्धन पंचायत समितीने १६ गावासाठी व ३७ वाड्यासाठी टेकर , वैलगाडीव्दारे पाणी पुरवठा करणे , यासाठी ६ टॅकरची तरतूद करण्यात आली आहे . तसेच ३३ गावांना विंधन विहीरी घेणे , व १ वाडयाना असे एकून १०४ , श्रीवर्धन तालुक्यामध्ये ४९ गाव , १०८ चाडया पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी अंदाजे ७७ लाख रूपयांची तरतुद सुध्दा करण्यात आली आहे , मात्र ही करनी कृती आराखड्यातील तरतुद फक्त कागदावर राहील्लो आहे . गेल्या सध्द पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला होता . त्यावळी १३ बोअरवल मंजूर करण्यात आले हो - त्यापकी श्रीवर्धन तालुक्यामध्ये प्रशासनाने एकही वोअरवेल श्रीवर्धन तालुक्यामध्ये खेड्यापाड्यातील नागरिकांसाठी मारण्यात आलेली नाही . उलट त्यासाठी मसूर करण्यात आलेला लाखो रूपयचा निधी परत पाठवला गेला ही पाव खेदजनक आहे . गेल्या वर्गी बोअरवेल मारण्यात आल्या नाहीत , पुन्हा आता तेवढयान प्रमाणामध्ये बोअरवेल पंचायत समि तोकडून मंजूरी मिळाली . परंतु कागदावरच आहे . उलट पाण्यासाठी महिलावर्गाला कित्येक मैल पायपीट करावी लागत आहे , याकडे श्रीवर्धनचे प्रशासन डोळ्झाक करत आहे . श्रीवर्धन तालुक्यातील पाणी टंचाईचा परिस्थितीवर प्रशासन लक्ष केंद्रित करतांना दिसत नाही श्रीवर्धन तालुका टंकरमुक्त करण्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे काही दिवसामध्ये दिपी , आराठी , भोस्त , गौळवाडी आखिरी गौळवाडी , बोलीपंचतन पारळ , कारविण , काले , गुळधे चिखली , मारवाड़ा , कुणबीवाडी गालसर काटी , सर्वमस्जिद हुनरव ली , घारवळी , काळीने , बागमांडला कोळीवाडा शिन , कापोली मारळ गाणी , इत्यादी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे . या गावामध्ये प्रशासनाने टॅकरच्दारे पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केलेली आहे . मात्र ती फक्त कागदावरच केलेली आहे . त्यामुळे गावांना पाण्याची टंचाई सामोरे जाने लागत आहे असा इसाळ कारभार प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप पाणी टंचाईग्रस्त गावातून केला जात आहे .
मागील वर्षे १२ बोअरवेल मंजुर झाले होते . त्यापैकी एकही बोअरवेल प्रशासनाने मारली नाही . तीव्रपाणी टंचाई गायाना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासन दुर्लक्ष करत आहे . प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
-बाबुराव चोरगे , पंचायत समिती उपसभापती
श्रीवर्धन पंचायत समितीचे प्रशासन के लोकप्रतिनिधींची बाजू ऐकून घेत नाही . मनमानी कारभार सध्या सुरू आहे . त्यामुळे पाण्याची भिषण टंचाई होत आहे . पाणी टंचाई निवारण कृती आराखडा फक्त कागदावरच राही लेला आहे . यामुळे पाणीटंचाई सारखे प्रश्न निर्माण होत आहे.
-मंगेश कोमनाक , पंचायत समिती सदस्य

إرسال تعليق