नरेंद्र मोदींना कुभंकरण म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत कोणती सेटलमेंट केली : सुनिल तटकरे


राममंदिर प्रकरणी नरेंद्र मोदींना कुभंकरण म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत कोणती सेटलमेंट केली हे जनतेला सांगावे : सुनिल तटकरे : शिवसेनेला धक्का माजी जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीत दाखल

दलीत, सवर्ण, मुस्लीम हिंदू राजकारणाला केंद्र सरकार जबाबदार : माणिक जगताप

सुनिल तटकरे हे आमच्या पक्षाचे उमेद्वार : आ. पंडीत पाटील

म्हसळा : निकेश कोकचा 

 राममंदिर प्रकरणी आम्ही आयोध्येत दिल्लीतल्या कुंभकरणाला जागे करण्यासाठी जात आहोत असे, शिवसेनेच्या पंढरपुर येथिल सभेत उद्धव ठाकरे यांनी भाष्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले होते. कोल्हापुर येथिल सभेत हे नालायकांचे सरकार आहे असे,भाष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी युतीसाठी भाजपसोबत कोणती सेटलमेंट केली आहे हे किमान जनतेला तरी सांगावे असे आवाहन माजी मंत्री तथा रायगड लोकसभेचे उमेद्वार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथिल जाहीर सभेत केले. तर देशात चाललेल्या दलीत, सवर्ण, हिंदू - मुस्लिम राजकारणाला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टिका मा.आ. माणिक जगताप यांनी या सभेत केली.

रायगड -सत्नागिरी लोकसभेचे उमेद्वार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ आघाडीमार्फत बुधवार दि. १७  एप्रिल रोजी म्हसळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये शेकापचे आ. पंडीत पाटील, आ. अनिकेत तटकरे, राकॉ. चे मुंबई उपाध्यक्ष भास्कर दाजी विचारे,मा.आ. लोखंडवाला, कॉग्रेस नेते  गुलाम पेशमाम, कॉग्रेस महिला अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, राष्ट्रवादी नेते अलिशेट कौचाली,उल्पसंख्याक अध्यक्ष नाजीम हासवारे, दानिष लांबे,मनसेचे फैसल पोपेरे, कॉ. तालुका अध्यक्ष मोईज शेख, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष समिर बनकर, निरीक्षक सानिया धूम, कुणबी समाज अध्यक्ष महादेव पाटील, युवक अध्यक्ष संतोष पाखड, फैसल गिते यांच्या सहीत सर्व जि.प. सदस्य, पं समिती सदस्य, सभापती, गण अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रा.पं सरपंच व हजारोच्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थिीत होते.

म्हसळा हा ऐतीहासीक तालुका असुन येथिल नवाबाने सर्वधर्म समभावाचा नारा देत तालुक्यासहीत परिसराचा विकास केला होता. याच तालुक्यातून आंबेत सारख्या गावामध्ये जन्मलेले स्व. बॅ. एआर. अंतुले यांनी  महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असताना मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून सर्वधर्मसमभावाची जाणीव संपुर्ण महाराष्ट्राला करूण दिली असल्याची माहिती तटकरे यांनी या सभेत दिली. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून १५ लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार व १० कोटी रोजगार निर्मिती तयार करणार असल्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवा असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले. मी आयोध्येत जाऊन राममंदिरासाठी दिल्लीत झोपलेल्या कुंभकरणाला जागा करीण, केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार नालायक आहे असे भाष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता निवडणूकी काळात भाजपा सोबत कोणती सेटलमेंट केली आहे ते जाहिर पणे जनतेला सांगण्याचे आवाहन तटकरे यांनी केले. रायगड जिल्हयातील दिवेआगर, मुरुड, गोरेगाव येथे  गिते यांनी सौचालया पलीकडे काही बांधले असेल तर ते सांगावे व दोन हजार रुपये घेऊन जावे असे वक्तव्य यावेळी तटकरे यांनी आपल्या भाषणात केले.
केंद्रामध्ये आलेल्या भाजप - शिवसेना  सरकारने देशात दलित , सवर्ण, हिंदू - मुस्लिम असा वाद निर्माण केल्याने सर्वसामन्य जनता यांच्या दहशतीखाली असल्याचे वक्तव्य मा.आमदार. माणिक जगताप यांनी या सभेत केले. मोदि सरकारने जनतेला फक्त चुनावी जुमल्या व्यतिरिक्त काहीच दिले नाही. मेक इन इंडिया, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत दाखवणाऱ्यानी रायगडमध्ये एकतरी कारखाना आणला का ? असा प्रश्न जगताप यांनी यावेळी उपस्थित केला. बॅ. अंतुले व बाळासाहेबांचे संबध हे विचाराचे नसुन मैत्रीचे होते, गिते यांनी आत्ताच राजकारणात प्रवेश करणाऱ्या नाविद अंतुले यांचा फक्त स्वताच्या स्वार्थासाठी वापर करीत असल्याचा आरोप जगताप यांनी यावेळी केला.

सुनिल तटकरे हे आमच्याच पक्षातील उमेद्वार असल्याचे मी दोन वर्षाआधि जाहीर केले होतो. यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये अलिबाग मतदार संघातून त्याना सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याची घोषणा अलिबाग मुरुड येथिल शेकापचे आमदार पंडीत पाटिल यांनी या सभेमध्ये केली. कॉग्रेसचे गुलाम पेशमाम, अॅ. श्रदधा ठाकूर व राष्ट्रवादीचे दाजी विचारे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सर्वधर्मसमभावाचा नारा देत मोदी सटरकारवर टिका केली.



सेनेला धक्का शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक अप्पा विचारे यांनी  म्हसळा येथिल सभेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला श्रीवर्धन मतदारसंघामध्ये  धक्का बसला आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा