श्री धावीर देव मंदीर वर्धापन दिन उत्साहात साजरा ; माहिलांचे रेझीम पथक ठरले आकर्षण



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा येथील ग्रामदेव श्री धावीर देव मंदीराचा ३रा वर्धापन दिन मोठया उत्साहांत साजरा झाला. सकाळी ६वा. उपाध्यक्ष श्री. नंदू गोविलकर यांच्या हस्ते सपत्नीक श्री धावीर देवाची यथासांग षोडोपचार पूजा महेश जोशी गुरुजी यानी सांगितली  यावेळी अध्यक्ष सुभाष उर्फ बाळ शेट करडे व बहुतांश समाजाचे विश्वस्त मंडळी व महीला वर्ग मोठया संखेने उपस्थित होता. सकाळी ११वा. श्री धावीर देवाची पालखी व शोभा यात्रा मंदीरा पासून ब्राह्मण आळी, जैन कॉलनी, साळीवाडा, कुंभारवाडा, मार्गे मार्गे एसटी स्टँड, पोलीस लाईन, जैन मंदीर , बाजारपेठ, सोनार आळी , तांबट अळी , जगन्नाथ शंकर शेट मार्गे श्री धावीर देव मंदीर पटांगणांत आणण्यात आली. शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण होते श्रीवर्धन येथील शिवब्रह्म ढोल ताशा पथक व त्या तालावर नाचणाऱ्या महिलांचे पथक. कार्यक्रम यशस्वी करण्यात श्रीमती अर्पणा ओक, सुलभा करडे, मिनल ढवळे,भक्ती करडे, गौरी पोतदार, ज्योती करडे, दिपाली हेगीष्टे,निलीमा पोतदार, प्रक्षा खुळे, चैताली करडे, भाविका पोतदार, अनिता करडे , ज्योती करडे, रेखा धारीया, कल्पिता करडे, सौ.पानसरे , कु.निमिषा हेगीष्टे यानी उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी भाविक श्रीधावीर देवाचा जयघोष करीत होते. दरवर्षी चैत्र शुद्ध १४ होणाऱ्या श्रीधावीर देव यात्रेचा शहरांत माहोल तयार झाला आसल्याची जाणीव शहरांत झाली.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा