ज्यांची गावात पत नाही त्यांनी आम्हाला सामाजिक हित काय असते हे शिकवू नये - महादेव पाटील यांचे अनिल काप यांना सडेतोड उत्तर


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   म्हसळा तालुका कुणबी सामाजाच्या वतीने काही समाज बांधवांनी आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना तर काही समाज बांधवांनी युतीचे उमेदवार अनंत गीते यांना पाठिंबा दर्शविला आहे यावरून राजकीय व सामाजिक वातावरण तापू लागले असून जसे युती आघाडीचे उमेदवार जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते देखील सामाजिक पातळीवर विकासात्मक व भावनिक मुद्यांवर तर्क वितर्क लावून समाजा समाजात तेढ निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे.
 रायगड लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजाने विकासाच्या मुद्यांवर आघडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून कुणबी समाजाचे मुंबई संघटना युवक अध्यक्ष अनिल काप यांनी तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांच्यावर टीका केल्याने पाटील यांनी काप यांना उत्तर देताना सांगितले की कुणबी समाजोन्नती संघाचे ध्येय धोरणं आम्हाला शिकवू नये त्याचबरोबर तुमचं जेवढं वय आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने मी समाजाची निस्वार्थी पणाने सेवा केली आहे आणि हे सर्व माझ्या सुशिक्षित समाज बांधवांना चांगले माहीत आहे. अनिल काप म्हणजे ज्यांची गावात नाही पत आणि स्वतःला समजतात गणपत अशा व्यक्तीने माझ्यावर टीका करून स्वतःचा उदोउदो करून घेण्यापेक्षा सामाजिक हित कसे साध्य करता येईल याकडे लक्ष द्यावे असा सल्लाही महादेव पाटील यांनी दिला आहे. तसेच सुनिल तटकरे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही तटकरे यांना मतदान करणार आहोत त्यामुळे कोणीही सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि मला जर का समाज नेते भूषण बरे यांच्या बाबत बोलण्याचा अधिकार नसेल तर अनिल काप यांना मला जाब विचारण्याचा अधिकार कोणी दिला आहे असे प्रत्युत्तर अध्यक्ष महादेव पाटील यांनी केले आहे.
    तसेच कुणबी समाज माजी तालुका अध्यक्ष श्रीपत धोकटे यांनी देखील अनिल काप यांच्या भूमिकेचा समाचार घेताना सांगितले की ओठ पिळले तर दूध येईल अशांनी आम्हाला समाज हित शिकवू नये तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते साहेब हे जरी कुणबी समाजाचे असले तरी भावनिक विचार करून आम्ही यावेळेस मतदान करणार नाही तर विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अनिल काप यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करू नये तसेच त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे समाजाला सांगावे असे माजी अध्यक्ष श्रीपत धोकटे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा