बाल सुधार केंद्रातील मुलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेत सचिन कांबळे यांनी सेलिब्रेट केला वाढदिवस



टीम म्हसळा लाईव्ह
वाढदिवस म्हटले की सेलिब्रेशन आले. मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करण्यास तरुणाई उत्सुक असते. मात्र, या सर्व गोष्टी करता सामाजिक जाणिवांचे भान ठेवत बाल सुधार केंद्रातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या श्री सचिनजी अनंत कांबळे यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

नेरुळ येथील बाल सुधार केंद्रात आपल्या कुटुंबियांसमवेत केक कापून बाल सुधार केंद्रातील मुलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. सोबतच त्यांनी या मुलांना करियर मार्गदर्शन ही केले. आणि मुलांना भेट म्हणून पुस्तक दिली. घरातूनच समाजसेवेची शिकवण मिळालेले खरसई गावचे सुपुत्र श्री सचिन अनंत कांबळे यांनी इंजिनिअरिंग ची पदवी संपादित केली असून सध्या ते भगूबाई मफळतलाल पॉलिटेक्निकल कॉलेज विलेपार्ले येथे प्रोफेसर आहेत. तर त्यांच्या पत्नी डॉक्टर असून त्याही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा