म्हसळा (बाबू शिर्के)
शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजप तर्फे म्हसळा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.शिवसेना झिंदाबाद, नरेन्द्र मोदी झिंदाबाद चे नारे देत भाजप कार्यलयातून या मिरवणुकीची सुरवात होऊन म्हसळा बस स्थानक, भाजी मार्केट, धावीर मंदिर परिसर फिरून शिवसेना कार्यालयात संपन्न झाली.यावेळी भाजप उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, माजी सभापती महादेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के, भाजप तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, शहरप्रमुख अनिकेत पानसरे, भाजप शहराध्यक्ष मंगेश मुंडे, प्रकाश रायकर, मुंबई विभाग प्रमुख जय मोहिते, मंगेश म्हशीलकर, आणी युतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

إرسال تعليق