सरपंच कोणाच्या आशीर्वादाने आहात ?
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता . म्हसळे मुंबई - युवाध्यक्ष अनिल काप यांचा महादेव पाटील यांना सवाल
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
जरा कोणाच्या आशीर्वादाने सरपंच आहात ते , जरा स्वतःच्या मनाला विचारा . जर तुमच्या सामाजिक कार्याएवढे आमचे वय नाही हे नक्की पण त्या तुमच्या वयाचा काय उपयोग जर सामाजिक नियम पायदळी तुडवत असाल तर त्या वयाचा काय उपयोग ! लोका शिकवी ब्राह्म ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण , असा टोलाही त्यांनी लगावला . आमचे ओठ दुधाचे पण आणि मधाचे ही पण तुमचे ओठ कुठली नशा करतात हे तालुक्यातील माझ्या समाज बांधव यांना सांगा . कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता . म्हसळे मुंबई - युवाध्यक्ष अनिल काप यांचे महादेव पाटील आणि श्रीपत धोकटे यांना टोला , स्वार्थासाठी ज्यांनी तटकरे यांची गुलामी करणा - यांनी आम्हाला सामाजिक चळवळ शिकवु नये , कारण आम्ही समाजाच्या नियमाचे पालन करतो , आमच्या पत चा जर विचार केलात तर होऊन जाऊ द्या कधी भेट या तुमच्या गावात आणि माझ्या गावात मग कळेल कोणाची किती पत आहे ती . तटकरे यांचे गुणगाण गाणारया पाटील साहेब आपण जे सरपंच पद भोगत आहात तेव्हासुद्धा तुमच्या विरोधात तटकरे यांनी उमेदवार दिला हे विसरलात का तुम्ही हे एकदा सांगा . असा सवाल अनिल काप यांनी केला आहे

إرسال تعليق