टीम म्हसळा लाईव्ह
दिघी पोर्ट येथून लोखंडी कॉईल वाहतूक करणा-या ट्रेलरला, खरसई येथे नागरी वस्ती मध्ये सोमवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात व्यायामशाळेचे मोठे नुकसान झाले आहे. एमएच ४६ एच ११५४ या क्रमांकाचा हा ट्रेलर पहाटे ३ च्या सुमारस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने उलटला. या अपघातामध्ये खरसई गावामध्ये असणा-या व्यायामशाळेची भिंत दरवाज्यासहीत जामिनदोस्त झाली. अपघात पहाटे घडल्यामुळे सुदैवाने कोणतीहि जीवितहानी झाली नाही. दिघी पोर्टकडून बेकायदेशीर प्रमाणापेक्षा जास्त लोह व कोळसा वाहतुकीमुळे खरसई गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

إرسال تعليق