श्रीवर्धन मध्ये शिवसेनेची सभा संपन्न ; शिवसेना विकासासाठी कटिबद्ध आहे ..अनंत गीते




 मुस्लिम समाजातील अनेक तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
देशातील व राज्यातील विविध प्रकल्पांना चालना देण्याचे काम शिवसेना भाजपा युतीच्या सरकारने केले आहे .शिवसेना हा सर्वसामान्य माणसाचा पक्ष आहे . आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराची जाणीव सर्वांना असल्याने मीच   या   वेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीत  रायगड चा खासदार म्हणून निवडून येणार आहे.असे मत अनंत गीते यांनी सांगितले .
श्रीवर्धन नगरपरिषदे च्या पाठीमागील प्रांगणात शिवसेनेने प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी कार्यकत्यांना अनंत गीते यांनी संबोधित केले .विकास हा आमचा स्थायीभाव आहे .रायगड जिल्ह्यात अनेक कामांना आम्ही प्राधान्य दिले आहे. दिघी ते माणगाव ,मुंबई गोवा हायवे हे रस्त्यांचे काम आम्हीच मार्गी लावले आहे. आज  रायगड जिल्ह्यातील अनेक गावागावातून मुस्लिम तरुण शिवसेनेत प्रवेश करत आहे .शिवसेनेने  सदैव समाजकारण केले आहे .समाजातील सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचे काम शिवसेना स्थापने पासून करत आहे. रायगड जिल्ह्यातील जनतेने विकास कामांची चिंता करू नये .कोकणाच्या विकासासाठी युती सरकार कटिबद्ध आहे .कोकणात प्रामुख्याने पर्यटन व्यवसायास चालना मिळाली आहे. कोकण च निसर्ग सौंदर्य जगाला आकर्षित करत आहे.आम्ही पर्यटनास पूरक उद्योगांना कोकणात चालना देणार आहोत.रायगड जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदेशीर मच्छिमारी ला प्रतिबंध करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. मोदी सरकार ने देशाला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला आहे. .रायगड जिल्ह्यातील जनतेने मला स्वीकारले आहे  . दिवेआगार ग्रामपंचायत मी दत्तक घेतली ती पर्यटनास चालना देण्यासाठी परंतु विरोधक चुकीचा प्रचार करत आहे .दिवेआगार ग्रामपंचायत मध्ये विविध  पर्यटन पूरक विकास कामे मी मार्गी लावले आहेत . .या वेळची लोकसभेची निवडणूक ही भ्रष्टाचारा विरुध्द ची लढाई आहे .असे विद्यमान खासदार अनंत गीते यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी आपल्या मनोगतात पाच वर्षात मोदी सरकार ने केलेल्या विविध कामाची माहिती जनतेसमोर मांडली .त्याच सोबत गीते यांना मतदान करून मोदींचे हात बळकट करण्याचे आव्हान उपस्थित कार्यकर्त्यांना केले .सुकुमार तोंडलेकर , रवी मुंडे ,संजीव डेगवेकर ,तुकाराम सुर्वे  व ,मनोज गोगटे यांनी उपस्थितांना संबोधित केले .
 शिवसेनेने आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी श्रीवर्धन मधील प्रतोष कोलथरकर ,राजू चव्हाण ,जुनेद दुस्ते  ,मीना गाणेकर , मीना वेशवीकर व श्रीवर्धन  शहरा तून मोठया प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा