दामोदर पांडव यांची म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द गावचे सुपुत्र कट्टर शिवसैनिक दामोदर पांडव यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्याचवेळी राष्ट्रवादीत आल्यावर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल असा शब्द देण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार दामोदर पांडव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसळा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
दामोदर पांडव यांचे राजकीय क्षेत्रा व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी आहे तसेच खूप मोठा जनसंपर्क असून ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल असे बोलले जात आहे. तर दामोदर पांडव यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा