संजय खांबेटे : म्हसळा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने म्हसळयात कर्मचाऱ्याना अंजुमन हायस्कुल व ज्युनी . कॉलेज मध्ये प्रशिक्षण दिले. यावेळी सहा. मिवडणुक निर्णय आधिकारी तथा उप. विभागीय अधिकारी प्रविण पवार यानी निवडणूक विभागाचे मार्गदर्शक पुस्तीकेचा अभ्यास करून योग्य नियोजन व आदेशाचे काटेकोर पालन करावे असे मार्गदर्शन केले. यावेळी यावेळी मतदान केंद्राध्यक्ष (PO) , प्रथम मतदान अधिकारी (FPO) व इतर मतदान अधिकारी (0PO) अशा सुमारे ४०० कर्मचाऱ्याना १० झोनल ऑफीसर, १० सहा. झोनल ऑफीसर व मास्टर ट्रेनर च्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले . कार्यक्रमात EVM -VVPAT ची परिपूर्ण माहीती, मतदान यंत्र हाताळणे, जोडणी या बाबतचे प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रिये दरम्यानचे विविध फॉर्मचे नमुने भरणे बाबत माहीती देण्यात आली. यावेळी तहसीलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार के.टी. भिंगारे,निवडणूक निवडणूक नायब तहसीलदार नामदेव मोरे व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

إرسال تعليق