कै. पत्रकार अमोल जंगम याच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामिण रुग्णालयात फळवाटप



म्हसळा ( प्रतिनिधी )
म्हसळा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष तथा युवा पत्रकार कै. अमोल जंगम याच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त म्हसळा ग्रामिण रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमाचे आजोजन शनिवार दि. १६ फेबृ. रोजी करण्यात आले होते.
तालुक्यासहीत संपुर्ण जिल्हयामध्ये पत्रकार जंगम यांनि आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याना जिल्हा प्रेस क्लबचा युवा पत्रकार पुरस्कारही देण्यात आला होता. मात्र तरुण वयात  १६ फेबृ.२०१७ रोजी त्याना ऋदय विकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.टेबल नं ८ तर्फे जंगम यांच्या आठवणित द्वितीय पुण्यतिथीनिमित्त म्हसळा ग्रामिण रुग्णालयात रुग्णाना फळवाटप करण्यात आले. यावेळी वैदकीय अधिकारी डॉ.महेश मेहता,डॉ. शुक्ला, डॉ. गायकवाड, माजी आरोग्य सेवक दिलीप शिर्के, पांडूरंग कराडे, टेबल नं८  मित्रवर्गापैकी हेमंत बारटक्के, गणेश बिरवाडकर,प्रसाद बोर्ले, गणेश बदडे, शिवसेना शहर प्रमुख मुन्ना पानसरे, बाबा करडे, बंटि बोरकर, रोहन कळस आदि मित्रपरिवार उपास्थीत होता.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा