शासनाचा करोडो रुपयांचा निधी पाण्यात नागरिकांमध्ये नाराजी , उपोषणाचाही इशारा
श्रीवर्धन : भारत चोगले
रायगड जिल्हयातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द आहे. धार्मिक विधी नियमित होत असतात . याचप्रमाणे पर्यटनस्थळ असल्यामुळे देशविदेशातील पर्यटक येथे येत असतात . या क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून १६ कोटीचा निधी मंजूर झाला . त्यापैकी ९ कोटी खर्चही झाला . मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे शासनाचा करोडो रूपयांचा निधी वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे . श्रीक्षेत्र हरिहरेश्वर तिर्थक्षेत्र विकास आराखडाचे नियोजन तयार करून ग्राम पंचायतीच्या मागणी नुसार या क्षेत्राला राज्य शासनाच्या माध्यमातुन तिर्थक्षेत्र हरिहरेश्वर च्या विकास कामाअंतर्गत १६ कोटी रूपये निधी विकास करण्यासाठी शासनाकडुन मंजूर करण्यात झाला . त्यापैकी अंदाजे ९ कोटौ रूपये निधी खर्च झाला आहे येथे येणार्या भक्तांना व पर्यटकांना येथील सुशोभीकरण ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे संपुर्ण दक्षिण काशी परिसर भक्कास झालेला बघावयाला मिळत आहे त्याचप्रमाणे या विकास कामामुळे येथील मंदिर परिसराचे असलेले सुंदर असे निर्सगाने दिलेले नॅचरल सौदर्य नष्ट करण्याचे काम या माध्यमातन होत आहे. विकास आराखडयाच्या माध्यमातुन बांधण्यात आलेल्या पायऱ्या त्या अतिशय खराब झाल्या असून त्या वरून पाय घसरून पडण्याची भिती नाकारता येत नाही . अनेक वेळा या दक्षिणकाशीच्या पवित्र भुमीत आल्यावर या पायऱ्या वरून ये - जा करत असताना पाय घसरून पडण्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . मंदिरामध्ये जाण्यासाठी पेशवेकाळीन जो मार्ग आहे , त्या मार्गलाही या माध्यमातुन कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही . तसेच गट नंबर ३८ जागा ही भुसंपादन करून येथे येणार्या पर्यटकांना धर्मशाळा व पार्किग व्यवस्था व्हावी म्हणून ग्रामपंचाय व देवस्थांनाची आग्रहाची मागणी आसताना याकडे प्रशासनाने दर्लक्ष केला. त्यामुळे त्या येणार्या संकटाना दररोज तोंड ग्रामपंचायतीला दयावे लागत आहे . तसेच ग्रामस्थांना व पर्यटकांना अर्धा किलोमीटर एसटीसाठी गावाच्या बाहेर जावे लागते . तसेच या क्षेत्राचे अनंत अडचणी असण्याचे वेळोवेळी ग्रामपंचायतीने पत्र व्यवहार करून देखील प्रशासनाने या क्षेत्राच्या सर्व बाबींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केला असल्याचे आरोप माजी उपसरपंच सचिन गुरव करत आहेत . या सर्व गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार न केल्यास उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असाही इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान हरिहरेश्वर तिर्थक्षेत्र व विकास कामाना विरोध नाही . विकास कामे ही व्हायला पाहिजे मात्र चुकीच्या पध्दतीने व निकृष्ट दर्जाची कामे होवु नयेत . विकास कामे चालु झाल्यापासुन या सर्व गोष्टी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील याकडे अधिकारीवर्गाचा दुर्लक्ष होत आहे विकास कामे व्यवस्थितरित्या सुरू होण्यापुर्वी संपुर्ण परिसराचा सर्वे होणे गरजेचे होते . भुसपदन करणे गरजेचे असताना त्या जागा भुसंपादीत केल्या नाहीत त्यामुळे अनेक अडीअडचणी ग्रामपंचायतीना सामोर जावे लागत आहे त्यातच कामाच्या शेवटी देखभाल दुरूस्तीही ग्रामपंचायतीला पहावयाची असते येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना स्वच्छ सुंदर पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र पहावयाला मिळाले पाहिजे हे ध्येय असले पाहीजे . जेणेकरून पर्यटनामध्ये वाढ होइल . त्यामुळे येथील रहिवाशांना रोजगार मिळ शकेल अशी मागणी आहे.
तिर्थक्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी हरिहरेश्वर व कालभैरव ही मंदिरे आहेत. या ठिकाणी भाविक व पर्यटक जगाच्या कानाकोपर्यातून येत असतात सन २००७ पासुन क्षेत्र विकास कामांतर्गत चालू असलेली कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत. तसेच हरिहरेश्वर येथील पर्यटन तसेच सौंदर्य नाहीसे होत चालले आहे. ग्रामपंचयातीच्या माध्यमातुन संबधित खात्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून काही वेळा प्रत्यक्ष भेटून माहिती देत असतो. विकास कामे दर्जेदार बनवून ती लवकरच पुर्ण करण्यात यावीत. जेणे करून पर्यटक अधिकाधिक येवुन रोजगारामध्ये सुध्दा वाढ होईल .
- साधना मांडवकर, सरपंच हरिहरेश्वर ग्रामपंचायत
हरिहरेश्वरला राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्यने येत असतात धार्मिक कार्यासाठी सुध्दा हे ठिकाण प्रसिध्द आहे या क्षेत्राला दक्षिणकाशी म्हणुन संबोधले जाते , असे असताना देखील वेळोवेळी ग्रामसभेमध्ये चर्चा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
-मंदार लीडकर , हरिहरेश्वर ग्रामस्थ

إرسال تعليق