म्हसळा : प्रतिनिधी
दिघी पोर्ट त्यांची होत असलेली अवजड वाहतुक, जमीनी व अनधीकृत उत्खनन . श्रीवर्धन म्हसळा तालुक्यात वाहतुक करतना नियम व शिस्ती मध्ये होत असलेले उल्लंघन या गोष्टी आता बस्स ( थांबवा) करा नाही तर तात्काळ वाहतुक बंद करा असे निवेदन शिवसेना अवजड वाहतूक सेना, युवासेना यांच्या वतीने उप विभागीय अधिकारी श्रीवर्धन, पोलीस उप अधिक्षक , श्रीवर्धन, तहसीलदार , म्हसळा,पोलिस निरीक्षक म्हसळा,दिघी पोर्ट, यांना देण्यात आले. यावेळी क्षेत्रीय विकास अधिकारी रविंद्र लाड , तालुका प्रमुख नंदू शिर्के , उप तालुका प्रमुख भाई कांबळे, वाहतुक सेना अध्यक्ष श्याम कांबळे, महादेव पाटील, युवा सेना अधिकारी अमित महामुणकर , संतोष सुर्वे, नितीन पेरवी, गणेश नाक्ती, नरेश मेंदाडकर ,अक्रम साने व सर्व वाहतूक सेनेचे सदस्य, पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते.
माणगाव ते दिघी हा रस्ता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषीत झाला असला तरी रस्ता अरूंद, अनेक ठिकाणी धोक्याची वळणे, वाहतुकीस आयोग्य असा आहे, सातत्याने या ५५ कि. मी. च्या रस्त्यावर अपघात होत असतात .आजच्या स्थितीत सुध्दा सदर रस्त्याची केवळ १९ टन माल वाहून नेण्याची क्षमता असताना त्यावरून ३०ते ४० टन मालाची वाहतुक होत असते . याकडे पोलीस व R.T.0 ने लक्ष देऊन कारवाई करून तात्काळ वाहतुक बंद करणे आवश्यक आसल्याची शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. दिघी पोर्ट ली. हे शासनाला हाताशी धरून स्थानिक शेतकऱ्यांवर दडपशाही करीत आहे. सकलप व खारगाव खुर्द मधील २८ शेतकऱ्यांच्या जमीनीतील मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले आसल्याचे सेनेने आपल्या निवेदनांत म्हटले आहे. दिघी पोर्ट स्थानिका ना डावलून परप्रांतीयाना नोकरी व्यवसाय देत आहे हे सुद्धा त्यानी तात्काळ थांबविणे आवश्यक आसल्याची सेनेची मागणी आहे. शासनाने या सर्वच गोष्टींत तात्काळ लक्ष न घातल्यास दिघी पोर्ट वीरुद्ध दिं.१५ ऑगष्ट ला रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा शिवसेनेने ईशारा दिला आहे.
إرسال تعليق