एस्.टी. प्रशासनाने संकट कालीन मार्ग बदलला : कर्मचाऱ्यानी मार्ग बंद करून प्रवाशांवरील संकटे वाढवीली.


फोटो: संकट कालीन मार्गात एस.टी. कर्मचाऱ्यानी ठेवलेली स्टेफनी दिसत आहे.


 संजय खांबेटे , म्हसळा 
"बहुजन हीताय बहुजन सुखाय" हे ब्रीद वाक्य घेऊन सेवा देणारे एस.टी. प्रशासन प्रवाशांकडून मार्गदर्शक सूचनांचा आदर करते , सुधारणा करते परंतु अनेक वेळा त्याच गोष्टींचा अनादर करून कर्मचारी प्रवाशाना वेठीस धरतात असा अनुभव प्रवाशाना येत असतो. तो कसा ते पहा.
एस्.टी. प्रशासनाने २००७-८ च्या दरम्यान नवीन गाड्यांची बॉडी बांधताना काही बसेसना कॅरीअर  टब नसलेला व संकट कालीन मार्ग हा दरवाजा ड्रायव्हर च्या मागे बसविला होता. हा दरवाजा अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे अपत्कालीन परिस्थीतीत सोयी पेक्षा गैरसोयच होणार. (कारण बहुतांश अपघात ड्रायव्हर चे  बाजूस  व  मागील 3 ते ४  बेंच पर्यंत होत असतात) २००९ साली घोणसे घाटांत ठाणे .- दिवेआगर बसचा भीषण अपघात झाला ३२ मृत व ४० गंभीर जखमी असा भयंकर अपघात होता, नेमके त्या वेळी संकट कालीन मार्ग  दरवाजा हा ड्रायव्हर सीटच्या मागेच होता. त्याच बाजूला एस.टी. कलंडल्याने  गाडीतील सर्व मृत व जखमी ड्रायव्हरच्या दरवाजाने काढावे लागले.एस.टी. प्रशासनाने संकट कालीन मार्ग ठेवण्याचा 
 आभ्यास न केल्याने मृत व जखमींचे हेळसांड झाली. सातत्याने तक्रारी केल्याने काही बसना प्रशासनाने (Modificatation) करून संकट कालीन दरवाजा आता मागील बाजूची एक सीट काढून केला परंतु ड्रायव्हर -कंडक्टर त्या दरवाज्याच्या मार्गावरच स्टेफनी ठेऊन संकट कालीन मार्ग बंद करीत आसल्याची तक्रार एस .टी.विषयक आभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते अनिल महामुनकर यानी केली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा