म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यामध्ये ७९ गावांपैकी तालुक्यामध्ये ३९ ग्रामपंचायतीची निर्मिती केली आहे त्या ग्राम पंचायतीसाठी शासन निर्णय आराखडानुसार २६ ग्रामसेवकांची पदे मंजूर करण्यात आली असताना त्यापैकी १७ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांची पदे भरले असून त्यातील आजही ९ पदे रिक्त आहेत . या विषयी सविस्तर वृत्त असेकी , म्हसळा तालुक्याची मुळात निर्मिती डोंगर दरीमध्ये झाली आहे काही गाव तालुक्याच्या ठिकाणाहून अनेक किलोमीटर दूर वसले आहे त्यामुळे तेथील ग्रामपंचायतीचा प्रशासन चालवणे म्हणजेतारेवरची कसरत करावी लागते एकाच भागामध्ये एकाच ग्रामसेवकाला दोन त्यापेक्षा पाच ग्रामपंचायतीचे कामे ग्रामसेवक करताना दिसत आहेत असे असताना देखील ग्रामीण भागातील लोकांना ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे दस्तऐवज वेळेत मिळत नाही कारण ग्रामपंचायतीचे संबधीत सर्व दाखले आता ऑनलाईन झाल्याने गावागावामध्ये इंटरनेट नेटवर्क ऑनलाईन सुस्थितीत नसल्याने दाखले देता येत नाही परिणामी जनतेचे हाल सर्वसामान्य पहावयास मिळत आहे त्यामुळे रिक्त असलेली ९ पदे भरल्यास ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा प्रशासन सर्वसामान्य जनतेची सेवा करणे ग्रामसेवकांना सोईचे होणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा ऑनलाईन कारभार पाहण्यासाठी शासनाने खाजगी कंपनी मार्फत आनलाइन ग्रामपंचायतीमध्ये डेटा ऑपरेटर पदाची नियुक्ती केली आहे परंतुते डेटाऑपरेटर काही ग्रामपंचायत वगळता बाकीच्या ग्रामपंचायतीमध्ये ते जात नसल्याने तेथील ऑनलाईन कारभार आजही बंद व्यवस्थेमध्ये आहे शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती इतीवृत व इत्यादी कामे हि ऑनलाईन करणे बंधनकारक असताना आजही काही ग्रामपंचायतीची कामे ऑनलाईन झालेली नाहीत असे असताना एका बाजूला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मेहनतीने काम करत असतात शासनाच्या योजना प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत पोहचत असतात परंतु अनेक ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या व्याप्तमध्ये ग्राम सेवकांना पुरेसा वेळ देता येत नाही तरी देखीलम्हसळा तालुक्यातील सामान्य प्रशासन उत्तम काम करत आहे रिक्त असलेल्या ९ ग्रामसेवकांची पदे भरल्यास ग्रामपंचायतीचा कामकाज सुरळीत चालेल . त्या मुळे आगामी काळात प्रशासन कीती लक्ष देतो हे पाहणे गरजेचे आहे
म्हसळा तालुक्यात ग्रामसेवकांची संख्या कमी असल्या कारणास्तव शासनाच्या सर्व योजना ऑनलाईन स्वरुपात असल्याकारणामुळे त्या वेळेत पूर्ण करणे ग्रामसेवकांना तारेवरची कसरत ठरत आहे तरी उर्वरित पदे भरल्यास उत्तम दर्जाचा व काम प्रत्येक ग्रामसेवक करतील शासनाच्या संपूर्ण योजना प्रत्येक व्यक्ती व घरापर्यंत पोहचवतील.
- योगेश सतिष पाटील म्हसळा तालुका अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

إرسال تعليق