विशेष प्रतिनिधी
मुंबईतील कोळीवाड्यांच्या धर्तीवर रायगड व ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व कोळीवाड्यांमधील जमीन परंपरागत कोळीबांधवांच्या नावावर केली जाईल , अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली . विधान परिषदेत आमदार . निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या उपप्रश्नावर महसूल मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली . मुंबई शहरातील कोळीवाडे गावठाण आणि आदिवासी पाड्यांच्या पुनर्विकासाबाबत शुक्रवारी ( दि . १३ ) विधान परिषदेत तारांकित प्रश्नावर चर्चा झाली . त्यावेळी पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रकांत कोळीवाडे पुनर्विकासाबाबत सहा महिन्यांत निर्णय घेण्यात . त्यावेळी येणार असल्याचे स्पष्ट केले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अँड . निरंजन वसंत डावखरे यांनी उपप्रश्न विचारला . त्यात रायगड व ठाणे जिल्ह्यातील कोळीवाड्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली . कोळी अथवा बिगर कोळी व्यक्तीने एखाद्या सरकारी जागेवर अतिक्रमण केले असेल वा ते त्या परंपरागत जागेवर रहिवास करीत असतील . त्यांना जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे . त्यानंतर मुंबईतील कोळीवाड्यांचे रेखांकन करण्याचा निर्णय झाला . मुंबईतील रेखांकन पूर्णही झाले आहे . मुंबईच्याच व आता धर्तीवर रायगड ठाणे जिल्ह्या - तील कोळीवाड्यांमधील परंपरागत रहिवाशांच्या जागा त्यांच्या मालकीच्या होतील . ज्या ठिकाणी कोळीवाडे आहेत , त्यांच्या नावावरही जमिनी केल्या जातील , असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले .
हजारो कोळीबांधवांना दिलासा...
रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी परंपरागत कोळीवाडे वसलेले आहेत . बदलत्या काळाबरोबरच कोळी कोळीवाड्यातील बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे नावावर त्यातच जमीन नसल्यामुळे घरांचा विकास करण्यापासून वंचित राहावे लागत होते . मात्र आता जमीन नावावर होणार असल्यामुळे नागरिकांना मनाप्रमाणे घरे बांधता येणार आहेत .

إرسال تعليق