परम पूज्य सुदीक्षा जी संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख पदी विराजमान...



निरांकरी सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आदेश व आशीर्वादानुसार त्यांची सुकन्या परम पूज्य सुदीक्षा जी यांना कल  संत निरंकारी मिशनच्या निरंकारी सद्गुरू आणि आध्यात्मिक प्रमुख म्हणून विधिवत रूपात विराजमान झाल्या , दिल्ली येथे आयोजित एका विशेष सत्संग समरोत औपचारिकरित्या ही घोषणा सदर करण्यात आली. सत्संग समारोहामध्ये सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांचे आगमन होताच त्यांचे निजी सचिव संदीप गुलाटी यांनी समस्त निरंकारी भक्तगणांच्या वतीने पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे स्वागत केले . त्यानंतर सद्गुरू माता सविंदर हरदेवजी यांनी सुदीक्षाजी यांच्या मस्तकावर टिळा लावला आणि निरंकारी सद्गुरू आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असलेला श्वेत दुपट्टा एका भक्ताच्या सहयोगाद्वारे त्यांच्या गळ्यात घातला . तदनंतर संत निरंकारी मंडळाचे प्रधान श्री गोविदसिंहजी , संत निरंकारी मंडळाच्या केंद्रीय योजना व सलागार बोडींचे चेअरमन श्री . खेमराजजी , संत निरंकारी मंडळाचे महासचिव व्ही डी. जगपाल जी आणि५ प्रचार प्रबंध व्यवस्थेशी संबंधित अन्य वरिष्ठ संतांनी तसेच गुरु परिवारातील सदस्यांनी समस्त निरंकारी परिवाराच्या वतीने सद्गुरू सुदीक्षाजी यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले . उपस्थित भाविक - भक्तगणांना आपले आशीर्वाद प्रदान करताना माता सविंदर हरदेवजी महाराज म्हणाल्या की , आता हरदेवांना अपेक्षित असलेले खूप काही करावयाचे बाकी आहे जे आपण करू शकलेलो नाही . आता हीच प्रार्थना की आशा आहे ती , आपण सर्व सुदीक्षाजींच्या मार्गदर्शनाखाली ते कार्ये पूर्ण करू शकू . निरंकारी सद्गुरू म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या प्रवचनामध्ये सद्गुरू सुदीक्षा म्हणाल्या की , हे पद सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही गुण नाहीत , तथापि , केवळ साधसंगत चे आशीर्वाद असल्याने ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे प्रत्येक भक्ताकडून त्यांनी सहयोग व आशीर्वादची कामना केली . त्या पुढे म्हणाल्या की , ज्याप्रमाणे बाबा हरदेवसिंहजी  यांनी संतसंगतीला आपला सरताज मानले तसच त्याही संतसंगतीला आपला सरताज मानत राहतील . या समारोहातील भक्तीगीते विचार आणि कवितांच्या पश्चात सद्गुरू सुदीक्षाजी यांनी पुन्हा एकदा आपली जबाबदारी निभावण्यासाठी सर्वांकडून आशीर्वादांची कामना केली आणि म्हटले की , आम्हाला आपले पहिले पाऊल योग्यप्रकारे टाकले पाहिजे जेणेकरून सद्गुरुद्वारा दिली गेलेली कार्य संपन्न होऊ शकतल समारोहामध्ये केंद्रीय योजना सल्लागार सदस्य , कार्यकारिणी समितीचे सदस्य , सेवादल अधिकारी तसेच अनेक झोनल इंचार्ज आणि ग्रेटर दिल्ली व अन्य राज्यांतून आलेल्या हजारो भाविक भक्तगणांनी भाग घेतला . परमपूज्य सुदीक्षा यांचा जन्म १३ मार्च , १९८५ रोजी दिल्ली येथे झाला आणि त्या मानसशास्त्र या विषयाच्या पदवीधर आहेत . डिसेंबर २०११ पासून त्या संत निरंकारी मंडळाच्या विदेश विभागाच्या प्रभारी म्हणून काम करत होत्या व त्या दरम्यान त्यांनी ६० पेक्षा अधिक देशाम धील मिशनच्या कार्यासाठी मार्गदर्शन केले आहे . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा