श्रीवर्धन शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जटील...


श्रीवर्धन : संतोष चौकर
श्रीवर्धन शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला शहरातील बेशिस्त वाहनचालक आणि जिल्हा वाहतूक शाखा हे दोन्हीही जवाबदार असल्याचा आरोप येथील नागरीक करीत आहेत . श्रीवर्धन तालुका पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात . दिवेआगर व हरिहरेश्वर येथे येणारे पर्यटक श्रीमंत पेशव्यांच्या जन्मस्थानी आवर्जुन येतात . स्थानिक नागरिक व पर्यटकांची वाहने यामुळे श्रीवर्धन शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जटील झाली आहे शहरातील दुचाकीस्वार अत्यंत बेशिस्त झाले असुन आपल्या दुचाकी रस्त्याच्या वेड्यावाकड्या उभ्या करून ठेवत  असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते . त्यातच येणारे पर्यटक मार्गफलक लावलेले असतांना सुद्धा जागोजागी वाहने थांबउन रस्ता विचारतात त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते . शिवाय शहरातील व्यापार्यांचा माल घेऊन येणारे मालक त्यांना ठरउन दिलेल्या वेळी न येता केव्हाही येत असल्याने वाहतूक कोंडी नित्याचिच झाली आहे अनेक व्यापारी आपल्या दुकानातील माल बाहेर रस्त्यावर लावत असल्याने पादचारी रस्त्यावर नीट चालु शकत नाही . नगरपरिषद केव्हातरी कारवाई करते , तेव्हढ्यापुरते व्यापारी माल आत घेतात . नागरिकांना पाच मिनिटांच्या प्रवासासाठी पंधरा ते वीस मिनिटे वाया घालवावी लागतात . काही वर्षांपूर्वी शहरातील वाहतूकीचे नियमन स्थानिक पोलिस ठाण्याजवळ होते . परंतु जिल्हा वाहतूक शाखा स्वतंत्रपणे स्थापन झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे जिल्हा वाहतूक शाखेसाठी एका पोलिस निरिक्षकाची स्वतंत्र नेमणूक अलिबाग येथे आहे . खारपाडा ते पोलादपूर या हद्दीतील वाहतुकीचे नियमन हा आधिकारी अलिबाग येथे बसुन करत असतो . श्रीवर्धन शहरात दोन ते तीन वाहतूक पोलिसांची गरज असताना येथे केवळ एकच कर्मचारी नेमण्यात येतो . त्यामुळे बाजारपेठ , जुना बसस्टेंड , वाणीआळी , शिवाजीचौक , टिळक मार्ग येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते . पोलिस नसल्यामुळे अनेक अल्पवयीन मुले व मुली दुचाकी व कार चालवतात . मद्यपान करून वाहन चालविणारे पोलिस नसल्यामुळे बिनधास्त पणे धूम स्टाईलने दुचाकी हाकतात . शहरातील वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने वाहनचालक बेदरकार व बेशिस्त झाले आहेत . तरी रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल पारसकर श्रीवर्धन शहरात वाहतूक पोलिस नेमण्याकडे लक्ष देतील जादा का ? असा सवाल नागरीक करीत आहेत . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा