श्रीवर्धन तालुक्यात अतिवृष्टी चे पडसाद ; सर्वा नानवेली रस्ता खचला : समुद्राच्या संरक्षक भिंतीस धोका निर्माण


श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते

या वर्षी पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावत तालुक्यात सर्वत्र थैमान माजवले आहे. त्या सोबत सरकारी यंत्रणेची असक्षमता निदर्शनास आली आहे. समुद्राच्या लगत असलेल्या आदगाव सर्वा या मार्गावर सर्वा गावाच्या हद्दीत वाहतुकीचा मुख्य रस्ता खचला आहे. मात्र सरकारी यंत्रणेकडून अद्याप कुठलीच हालचाल झालेली नाही.
   गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला .एका आठवडा निरंतर मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले . दिवेआगार, बोर्लीपंचतन, वेळास, आदगाव,सर्वा ,नानवेली व दिघी हे समुद्र किनाऱ्याच्या लगत वसलेल्या गावांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. आदगाव रस्त्यावर सदैव दरडीची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वा हे गाव बोर्लीपंचतन पासून 18 किमी अंतरावर आहे तर दिघी पासून अवघे 08 किमी अंतरावर आहे. गावची लोकसंख्या अंदाजे 1500 च्या आसपास आहे . गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे . दोन वर्षा दिघी कोळीवाडा ते सर्वा गावाच्या बाह्य भागा पर्यंत जवळपास 12 किलोमीटर चा रस्ता तयार करण्यात आहे .सर्वा गावात समुद्राच्या उधाण प्रसंगी पाण्यास प्रतिबंध करण्यासाठी संरक्षक भिंत बांधली आहे .सर्वा गावाच्या  मुख्य  प्रवेशद्वाराच्या जवळ वसलेल्या लोकवस्ती पासून  ते स्मशान भूमी पर्यंत संरक्षक भिंत बांधलेली आहे .  अतिपर्जन्यवृष्टीमुळे सर्वा गावाच्या   ग्रामपंचायत च्या  जवळ च मुख्य वाहतुकीचा रस्ता खचला आहे .मुख्य रस्ता व संरक्षक भिंत लगतच आहेत .रस्त्याला अंदाजे 3 फुट खोल खड्डा पडल्याचे निदर्शनास येत आहे  . स्थानिक लोकांना दिघी,नानवेली, सर्वा ,आदगाव हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे .सदर रस्त्याची रुंदी अंदाजे 18 फुटाच्या आसपास आहे .सर्वा मार्गावरून अवजड वाहतुक क्वचित प्रसंगी होते परंतु एस टी महामंडळाच्या बसेस ची वाहतुक निरंतर चालु असते .एस टी वाहतुक ही सदर मार्गावरील दळणवळणाचे मुख्य साधन आहे.  .लाखो रुपये खर्च करून बांधलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असलेला आरोप स्थानिक लोक करत आहेत.वेळीच खचलेला रस्त्याचे काम न केल्यास आगामी काळात समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरण्याची दाट शक्यता आहे .तसेच आठवड्या पुर्वी झालेल्या पावसाचे पाणी रस्ताच्या बाजुचा नाला तुंबल्यामुळे  सर्वा गावातील अनेक लोकांच्या घरात शिरले होते .सदर प्रसंगी प्रशासकीय यंत्रणेकडुन पंचनामे करण्यात आले आहेत. खचलेल्या सर्व रस्त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नसला तरी आगामी जीवितहानी च्या धोक्याचे लवकरात लवकर निवारण होणे गरजेचे आहे. त्या संदर्भात स्थानिक लोक रस्त्याचे काम लवकर करावेत अशी मागणी करत आहेत.
--------------------------------------------

दिघी सर्वा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काम पुर्ण झाल्यापासून संबधित ठेकेदाराने तीन वर्षे रस्त्याची देखभाल करणे गरजेचे होते परंतु ठेकेदाराने त्या कडे पुर्णतः दुर्लक्ष केले आहे .खचलेला रस्ता लवकरच सुव्यवस्थित करावा अन्यथा मोठा धोका सर्वा  ग्रामस्थांना उदभवू शकतो .
      मोतीराम परभळकर ( ओ बी सी विभाग राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीवर्धन(सर्वा ग्रामस्थ) )
-------------------------------------------
एक आठवडा धुवाधार पाऊस पडला आहे .सर्वा गावातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात मोठया प्रमाणात कचरा साचला होता त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले .तसेच मुख्य रस्ता खचला आहे त्या संबधी बांधकाम खात्यास कल्पना दिली आहे.
गुलदार हुसैनी (सरपंच सर्वा )
-------------------------------------------
पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी लोकांच्या घरात घुसले होते .त्या संदर्भात योग्य ती प्रशासकीय कार्यवाही केले आहे .सर्व लोकांच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे .
  चंद्रकांत गोवारी (ग्रामसेवक सर्वा )
--------------------------------------------
सर्वा येथील रस्ताच्या कामा संबधित अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे .लवकरच कामास सुरुवात करू .जनतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने सदर चे काम होणे आवश्यक आहे.त्यास आम्ही अग्रक्रम देत आहोत .
    पी. टी .जेट्टे (अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते श्रीवर्धन)

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा