दांडगुरी : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली ते दिघी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे . या रस्त्यावरून दिघी बंदरातील अवजड वाहतूक मोठया प्रमाणावर होते त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून या रस्त्यावरुन वाहन चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे त्यामुळे मोठा अपघात झाल्यावर खड्डे बुजविणार का ? असा सवाल संतप्त नागरिकांतून उपस्थित केला जात आहे . नुकताच दिघी - माणगाव - पुणे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग बनला आहे . त्यामुळे या मार्गावर आता रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण असणार आहे गेल्या ७ - ८ वर्षांपासून वडवली ते दिघी बंदर रस्त्यावरून दिघी पोर्टकडील कोळसा व कॉईल वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे . दिघी बंदर किंवा सा . बी . कडून या रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे होते . परंतु , दोघांनीही या गोष्टीची पूर्वदखल घेतली नाही . त्यामुळे नागरिकांना खड्यातून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे . वेळास फरशी ते भरणा हा रस्ता जास्तच खड्डेमय झाला आहे दुचाकीवरून जाताना मध्येच खड्डा आल्यास एखाद्याला जीवास मुकावे लागू शकते . दिघी पोर्टच्या अवजड वाहनांमुळे अगोदरच अनेक अपघात घडून जीव गमवावे लागले आहे . गेले कित्येक महिने आमदार तालुक्यातील रस्त्यावर फिरले नसल्याने या मार्गाची दशा लोकप्रतिनिधीना काय कळणार ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत . विशेष म्हणजे खड्डे पडलेल्या या रस्तयांवरुन जाताना महिला , रूणांना त्रास सहन करावा लागत आहे संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या डागडुजी किंवा दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा पंचायत समितीचे शिवसेनेचे उपसभापती बाबुराव चोरगे यांनी दिला आहे

إرسال تعليق