प्रतिनिधी म्हसळा
रायगडचे सुपूत्र व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित म्हसळा येथील वसंतराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागा तर्फे भारतीय असंतोषाचे जनक स्वातंत्र्यपुर्व काळातील युवकांचे प्रेरणास्थान असलेले लोकमान्य टिळक यांची जंयती साजरी करण्यात आली कु.विनिता जाधव या विद्यार्थीनीच्या सुत्रबंध आणि गोड आवाजाच्या सुत्रसंचालनाने कार्यक्रमास सुरुवात झाली प्रथम
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.एन.राघवराव सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन वंदन केले त्यानंतर श्री. सौरभ जंगम या विद्यार्थ्याने आपल्या अस्खलित इंग्रजी भाषेतुन लोकमान्य टिळक यांचा जीवन परिचय सांगितला त्यानंतर
सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. शिरीष समेळ यांनी लोकमान्य टिळकाची प्रसिद्ध असलेली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच या सिंहगर्जनेचे स्वातंत्र्य चळवळीत असलेले महत्त्व आणि महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रामध्ये लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या इंडस्ट्रीयल असोसिएशन आँफ वेस्टर्न रिजन चे कार्य आणि टिळकांनी स्वदेशी गुंतवणुकीला दिलेले महत्व याविषयी विचार मांडत असताना आषाढी एकादशीचे महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायात असलेले महत्व देखील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.आर.एस.माशाले यांनी लोकमान्य टिळकांची महाविद्यालयाच्या ग्रंथालयात असलेली ग्रंथसंपदा आणि त्याचे वाचन केल्यामुळें आपल्या व्यक्तीमत्वात होणारा बदल याविषयी विद्यार्थ्यांनां संबोधित केले कार्यक्रमाच्या शेवटी कु.अस्मिता जाधव या विद्यार्थीनीने आपल्या भारदस्त आवाजात सर्वाचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये श्री.मोहन जाधव श्री. राजेश गोविलकर, अक्षय बांद्रे , निखिल कदम ,ओकार खोत या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
إرسال تعليق