म्हसळा तालुक्याचा बारावीचा ९३.६१ टक्के निकाल; अंजुमन इस्लाम विज्ञान शाखेचा तर गोंडघर व मेंदडी वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल

म्हसळा तालुक्याचा बारावीचा ९३.६१ टक्के निकाल; अंजुमन इस्लाम विज्ञान शाखेचा तर गोंडघर व मेंदडी वाणिज्य शाखेचा  १०० टक्के निकाल

तालुक्यात पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींचा वरचष्मा  

म्हसळा - सुशील यादव


बारावीचा निकाल काल(३० मे) दुपारी ०१:०० वाजता जाहीर करण्यात आला असून म्हसळा तालुक्याचा ९३.६१ टक्के इतका निकाल लागला आहे.म्हसळा केंद्रा अंतर्गत बारवीच्या परीक्षेसाठी ७३६ विद्यार्थी बसले होते यापैकी ६८९  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षीच्या निकालाची विशेष बाब म्हणजे विज्ञान, वाणिज्य व कला या तीनही शाखेत पहिल्या तीनही क्रमांकांवर मुलींचा वरचष्मा पहावयास मिळाला.  म्हसळा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये २९४ विद्यार्थी परीक्षेत बसले असता त्यापैकी २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या कॉलेजचा एकूण निकाल ९१.४९  टक्के लागला असून कला शाखेत प्रथम क्रमांक येलवे अर्चना रवींद्र  ७३.६९ टक्के , द्वितीय घोसाळकर रश्मी राजेंद्र ६५.२३ टक्के, तृतीय पवार सायली विनोद ६४.७६ टक्के मिळवत क्रमांक पटकावला आहे.वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक खोत प्रणया प्रमोद ८५.२३ टक्के ,द्वितीय क्रमांक मांडवकर जागृती भागोजी ८०.६१ टक्के, तर तृतीय क्रमांक धीमर रोहिणी रतन हिने ७९.६९ टक्के इतके गुण घेत मिळविला . याच कॉलेज च्या मागासवर्गीय विद्यार्थी मध्ये प्रथम क्रमांक खांजी गोविंद नारायण ७६.९२ टक्के, द्वितीय क्रमांक फुटाणकर रेवती मोहन ७३.१५ टक्के, तृतीय क्रमांक येलवे अर्चना रविंद्र हिने ७३.६९ टक्के गुण घेत मिळवला आहे. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९८.३१ टक्के तर कला शाखेचा निकाल ८१.०३ टक्के लागला आहे. अंजुमन इस्लाम जंजिरा  ज्युनियर कॉलेज मधून विज्ञान शाखे मध्ये प्रथम क्रमांक फणसमिया सारा जावीद ७६.१५ टक्के, द्वितीय क्रमांक सोनुने श्रुती भगवान ७२.४६ टक्के, तर तृतीय क्रमांक हस्पटेल आस्मा अश्फाक हिने ७०.४६ टक्के गुण घेत पटकाविला आहे. कला शाखेत प्रथम क्रमांक पठान हुझेफा रफिक ५३.२३ टक्के , द्वितीय क्रमांक दर्झी शिफा अय्याझ ५०.६१ टक्के तर  तृतीय क्रमांक घनसार अमीरा इनायत हिने ४८.९२ टक्के गुण घेत मिळविला आहे.वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक शिर्शिकर अख्तरी झहीर अहमद ७८.६१ टक्के ,द्वितीय क्रमांक माणिकवारे मादिहा मुबीन ७६.३० टक्के,तर तृतीय क्रमांक वस्ता यास्मीन इनायत हिने ७४.७६ टक्के इतके गुण घेत मिळविला. पांगळोली ज्युनियर कॉलेज च्या विज्ञान शाखेचा निकाल ९७.८२ टक्के इतका लागला आहे. तर गोंडघर ज्युनियर कॉलेज चा निकाल ९४.५ टक्के इतका लागला आहे. यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल हा १०० टक्के आहे तर कला शाखेचा निकाल ८९ टक्के इतका आहे. मेंदडी कोंडच्या ज्यु . कॉलेजचा निकाल ९२ .१० टक्के इतका लागला आहे . यामध्ये कला शाखेचा ८२.८५ तर वाणिज्य शाखेचा १०o टक्के लागला आहे .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा