तुरुंबाडीत 'मंचेश्वर चषक २०२६' रंगणार; भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!

म्हसळा (रायगड): श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२६ च्या निमित्ताने क्रिकेट शौकिनांसाठी एका भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री हनुमान प्रासादिक मंचेश्वर सेवा मंडळ (तुरुंबाडी/मुंबई) आणि अंजनी महिला मंडळ (तुरुंबाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मंचेश्वर चषक २०२६' ही भव्य दिव्य अंडरआर्म रिंगण बॉक्स क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे.
ही स्पर्धा रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता होळीचे पटांगण, मु. तुरुंबाडी, ता. म्हसळा, जि. रायगड येथे सुरू होईल.
स्पर्धेतील मुख्य आकर्षणे आणि बक्षिसे:
खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी स्पर्धेत भरघोस रोख रकमेची बक्षिसे आणि आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत:
 
प्रथम क्रमांक: रोख १०,०००/- रुपये व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक: रोख ७,०००/- रुपये व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक: रोख ३,०००/- रुपये व आकर्षक चषक

वैयक्तिक बक्षिसे: याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, शिस्तबद्ध संघ आणि उद्घाटक विजयी संघ यांनाही विशेष आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप व नियम:
 ◆ स्पर्धेची प्रवेश फी १,२००/- रुपये ठेवण्यात आली आहे.
◆ 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर केवळ २४ संघांना प्रवेश दिला जाईल.
◆ प्रत्येक सामना ३ षटकांचा असेल आणि सामने 'गाव टू गाव' पद्धतीने खेळवले जातील.
◆ संघ रायगड जिल्हा पंचक्रोशीतील असतील आणि एका खेळाडूला एकाच संघात खेळता येईल.
 ◆ मैदानावर पंचांचा निर्णय अंतिम राहील, तसेच पंचांशी हुज्जत घालणाऱ्या किंवा गैरवर्तन करणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाद केले जाईल.
तरी परिसरातील जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी इच्छुकांनी जाहिरातीत दिलेल्या संपर्क प्रमुखांशी (जितेश भोपी, हरिश अनाजी, कामेश भोपी, जगदीश मुंबईकर, भालचंद्र चव्हाण) संपर्क साधावा.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा