म्हसळा | ८ जानेवारी २०२५
वारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कविता महेंद्र पेरवी व उपसरपंच श्री. किरण काशिराम चाळके यांच्या विरोधात आणण्यात आलेला अविश्वास ठराव आवश्यक मतसंख्येअभावी नामंजूर करण्यात आला. हा निर्णय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत घेण्यात आला.
सरपंचांवर भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच उपसरपंच मुंबईत वास्तव्यास असल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सभेमध्ये या आरोपांबाबत कोणतेही ठोस कागदोपत्री पुरावे सादर होऊ शकले नाहीत.
हात वर करून घेण्यात आलेल्या मतदानात एकूण ८ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने, तर ३ सदस्यांनी अविश्वासाच्या विरोधात मतदान केले. अविश्वास मंजूर होण्यासाठी ६ मतांची आवश्यकता होती. मात्र, एक मत कमी पडल्याने सरपंच व उपसरपंच यांच्याविरोधातील दोन्ही अविश्वास ठराव नामंजूर झाले.
दरम्यान, हा अविश्वास ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादातून आणण्यात आल्याचे मत ग्रामस्थ व मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
إرسال تعليق