म्हसळ्यात भाजपला खिंडार! तालुकाध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा 'धनुष्यबाण' हाती; राजकीय समीकरणे बदलणार



​म्हसळा : सुशील यादव 

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर म्हसळा तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे तालुक्यातील भाजपला मोठा धक्का बसला असून शिंदे गटाची ताकद मात्र कित्येक पटीने वाढली आहे.

​बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश :
​नामदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महेश पाटील यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ आणि प्रभावी मानले जाणारे पदाधिकारीही शिवसेना शिंदे गटात सामील झाले आहेत. यामध्ये
​लहू तुरे (माजी सरपंच, गोंडघर)
​समीर धनसे (अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष)
​प्रशांत महाडिक, गोविंद भायदे, शरद कांबळे आणि श्री. जाधव यांसारख्या दिग्गज कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच खारगाव बुद्रुक ग्रामपंचायत चे माजी सरपंच अकमल कादरी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला राम राम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे.
​मेंदडी विभागातून उमेदवारीचे संकेत?
​राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, महेश पाटील यांना मेंदडी मतदारसंघातून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याच आश्वासनावर हा पक्षप्रवेश झाल्याचे बोलले जात असून, यामुळे निवडणुकीपूर्वीच मेंदडी विभागातील गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
​"निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा बदल केवळ वैयक्तिक नसून तालुक्यातील विकासाची नवी रणनीती आहे," असे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.
​यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी सभापती रवींद्र लाड, प्रवीण बनकर, तालुका संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, दीपेश जाधव, अक्रम साने, नगरसेवक सुफीयान हलदे आणि उपतालुका प्रमुख पदरथ यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
​एकाच वेळी तालुकाध्यक्षांसह संपूर्ण फळीने पक्षांतर केल्यामुळे म्हसळा भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच झालेल्या या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे आता विरोधी गट कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात आणखी काही मोठे प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून म्हसळ्याचे राजकारण अधिकच तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा