म्हसळा (प्रतिनिधी): म्हसळा-गोरेगाव मार्गावरील खामगाव गावाजवळ आज एक मोठा वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सकाळपासूनच या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकारानंतर शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष नंदकुमार शिर्के यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला. "रस्ता बंद पडून तास उलटून गेला तरी प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहचलेला नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे," असे म्हणत त्यांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाने तत्काळ झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिर्के यांनी दिला आहे.
إرسال تعليق