वार्ताहर,
बी.पी. एड २ वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (MAH-B.P.Ed-CET 2025) नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सीईटी पोर्टलवर जाऊन बी.पी.एड अभ्यासक्रम 2025-26 शैक्षणिक वर्ष सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CET) नोंदणी करता येईल.
गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत चुकीचे तपशील भरल्यामुळे प्रवेश मिळवण्यात अडचणी आल्या होत्या. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आणि नोंदणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे विद्याधीराज कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, नवीन पनवेल येथे दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता समुपदेशन सत्राचे आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात विद्यार्थ्यांना बी.पी.एड. सीईटी नोंदणी फॉर्म योग्य प्रकारे भरण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी समुपदेशन सत्रात सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदिप शिंदे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ९८९२६०१८२२/ ८६५५५२३३०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
إرسال تعليق