राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पक्षाच्या आगामी निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र विकास घोषणापत्राची सादरीकरण समारंभ रोहा येथे आयोजित करण्यात आली होती, जिथे स्थानिक पदाधिकारी आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते घोषणापत्राचे प्रकाशन करण्यात आले.
या विशेष प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बांधवांसोबत संवाद साधला. मतदारसंघाच्या विकासासाठी जाहीरनाम्यात विविध योजना आणि प्रकल्पांचे विवरण देण्यात आले असून या घोषणापत्राद्वारे मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा दृढ संकल्प दर्शविण्यात आला.
إرسال تعليق