जिल्ह्यात पावसाचा कहर ! सकल भाग पाणीमय; पुढील तीन तास धोक्याचे


टीम म्हसळा लाईव्ह

जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याने सकल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील विविध सामानाचे देखील नुकसान झाले आहे. शुक्रवार पासूनच पावसाचे बरसणे सुरुच होते.




रात्री जोरदार पाऊस झाला, तसेच शनिवारी सकाळपासून पावसाने काही क्षणांची उसंत घेतली नाही. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अलिबाग शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच, पुढील ३ तासांत रायगडसह पालघर, ठाणे येथे काही ठिकाणी 45-55 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा